शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

प्रवासाचे ५० लाख प्रशासनाच्या खात्यावर; मजूर मात्र रस्त्यावरच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 11:15 IST

सोलापुरात नियोजनाचा अभाव; लॉकडाऊनच्या काळात लोकांचे हाल कायम

ठळक मुद्देउत्तरप्रदेश, बिहार राज्यात जाणाºयांसाठी सोलापुरातून रेल्वे सोडण्यात येत आहेतपरराज्यातील लोकांना एसटीने मोफत त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्याची तयारी पायी जाणाºया मजुरांना विश्वास देणारा एकही अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी रस्त्यावर दिसून आला नाही

सोलापूर : परप्रांतातील मजुरांच्या प्रवास सेवेसाठी राज्य शासनाने ५० लाख रुपये जिल्हा प्रशासनाच्या खात्यावर पाठवले आहेत; मात्र अजूनही शेकडो मजूर स्वखर्चाने गावी जात आहेत किंवा पायीच निघाले आहेत. अधिकारी बैठकांमध्ये व्यस्त आणि लोक त्रस्त अशी अवस्था झाली आहे.

लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून मजूर आणि सर्वसामान्य माणसांचे हाल होत आहेत. या आठवड्यात मजुरांच्या प्रवासाची सोय करण्यासाठी राज्य सरकारने जिल्हाधिकारी कार्यालयांकडे निधी पाठवला आहे. पण तो व्यवस्थित वापरात येत नसल्याचे पाहायला मिळत आहे. गुरुवारी शहरातील प्रमुख रस्त्यांवरुन अनेक मजूर गावी पायी निघाल्याचे पाहायला मिळाले. झारखंडचे प्रदीप कुमार आणि त्यांचे कुटुंबीय सोरेगाव येथून पायी निघाले होते. दोनवेळा रेल्वे स्टेशनकडे पायी जाऊन आलो. इथे गेले की आम्हाला काही माहीत नाही म्हणून सांगतात. आम्ही किती दिवस वाट बघायची. आम्हाला इथे खायला काही नाही. आम्ही थांबणार नाही म्हणत ते चालत राहिले.

सात रस्ता येथील रस्त्यावर झारखंड येथील सात ते आठ तरुण झोपले होते. हे तरुण एनटीपीसीच्या परिसरात राहायला असल्याचे सांगण्यात आले. रेल्वे तर सुरू झाली नाही. पण सोलापुरातून एखादी बस करुन गावी जाऊ. गावी जाण्यासाठी खर्च करण्याची तयारी असल्याचे या तरुणांनी सांगितले. गुरुवारी सायंकाळी तुळजापूर रोडने अनेक मजूर आपल्या कुटुंबासह पायी निघाल्याचे चित्र दिसत होते. पायी जाणाºया मजुरांना विश्वास देणारा एकही अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी रस्त्यावर दिसून आला नाही.

अधिकाºयांचे लक्ष केवळ निवारा केंद्रांकडे- महापालिकेच्या निवारा केंद्रामध्ये केवळ दोन ते अडीच हजार लोक होते. त्याहून अधिक लोक शहराच्या गल्ली, मोहल्ल्यांमध्ये अडकून पडले आहेत. या लोकांपर्यंत जिल्हाधिकारी, महापालिका कार्यालयातील अधिकारी पोहोचले नाहीत. महापालिकेच्या निवारा केंद्रात थांबलेल्या तामिळनाडूच्या नागरिकांसाठी सोलापुरातून रेल्वे सोडण्यात आली. उर्वरित राज्यातील नागरिक स्वखर्चाने गावी निघाले आहेत. उत्तरप्रदेशमधील मजुरांनी प्रत्येकी पाच हजार रुपये देऊन गाव गाठले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या बैठकांचे सत्र असते. या बैठकातून वरिष्ठ अधिकाºयांना वेळ मिळत नाही आणि कर्मचारी मात्र या गोष्टींकडे लक्ष देत नसल्याचे पाहायला मिळते.

उत्तरप्रदेश, बिहार राज्यात जाणाºयांसाठी सोलापुरातून रेल्वे सोडण्यात येत आहेत. लोकांनी चालत जाऊ नये म्हणून आम्ही आवाहन करतोय. पण लोक ऐकायला तयार नाहीत. परराज्यातील लोकांना एसटीने मोफत त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्याची आमची तयारी आहे. त्यादृष्टीने नियोजन करीत आहेत. लोकांनी चालत जाऊ नये असे आवाहन यापूर्वी केले आहे. आताही करीत आहोत.-संजीव जाधव, अपर जिल्हाधिकारी, सोलापूर.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस