कार्तिकी यात्रेसाठी आलेल्या 50 भाविकांना अन्नातून विषबाधा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 09:09 IST2019-11-09T09:07:25+5:302019-11-09T09:09:47+5:30
भाविकांवर रुग्णालयात उपचार सुरू

कार्तिकी यात्रेसाठी आलेल्या 50 भाविकांना अन्नातून विषबाधा
पंढरपूर : कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील 50 भाविकांना विषबाधा झाली असून पंढरपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संगमेश्वर येथील भाविक यात्रेच्या एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूर येथे आले होते. ते धुंडा महाराज मठा शेजारी इनामदार वाडा येथे वास्तव्यास होते. शुक्रवारी एकादशी असल्यामुळे त्यांनी उपवासाचे पदार्थ खाले होते. रात्री अडीच च्या सुमारास ५० ते ६० भाविकांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्या सर्व भाविकांना नगरपरिषदेच्या रुग्णालय उपचारासाठी दाखल केले. या भाविकांवर डॉ. धोत्रे उपचार करत आहेत. तसेच नगरपरिषदेचे कर्मचारी तेथे उपस्थित असल्याची माहिती उपमुख्य अधिकारी सुनिल वाळूजकर यांनी दिली.