शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
'मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली'; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
5
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
6
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
7
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
8
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
9
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
10
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
11
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
12
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
13
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
14
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
15
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
16
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
17
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
18
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
19
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
20
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल

Maharashtra Election 2019; मतदानासाठी आल्या १०९३६ शाईच्या बाटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 12:52 PM

सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तयारी पूर्ण

ठळक मुद्देविधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू हळूहळू आता प्रचाराचा पाराही चढलाअवघ्या सात दिवसांवर मतदानाची तारीख

सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाने मुंबईहून जिल्ह्यात १० हजार ९३६ शाईच्या बाटल्या पाठविल्या आहेत. मतदान केल्याची निशाणी म्हणून जिल्ह्यातील ३४ लाख ३४ हजार ५४९ मतदारांच्या बोटावर शाई लावण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पाच महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीत ४२ हजार ३६९ नवीन मतदारांची भर पडली आहे. 

विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. हळूहळू आता प्रचाराचा पाराही चढला आहे. २१ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यात मतदान होणार आहे. अवघ्या सात दिवसांवर मतदानाची तारीख येऊन ठेपल्याने निवडणूक विभागात लगीनघाई सुरू झाली आहे. मतदानासाठी लागणारी सर्व स्टेशनरी व साहित्य दाखल झाले आहे. ही सर्व स्टेशनरी जिल्ह्यातील ११ निवडणूक निर्णय कार्यालयांकडे पाठविली जात आहे.

मतदान केल्यानंतर मतदारांच्या तर्जनीवर निळी शाई लावण्यात येते. जिल्ह्यात ३५२१ मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक बुथवर दोन शाईच्या बाटल्या ठेवण्यात येणार आहेत. १0 घनसेंटीमीटरच्या बाटलीत ही शाई आहे. एका बाटलीमधून किमान ३५0 मतदारांच्या बोटावर शाई लावता येते. यासाठी मुंबईहून १0 हजार ९३६ शाईच्या बाटल्या आणण्यात आल्या आहेत. या शाईतून जिल्ह्यातील ३४ लाख ३४ हजार ५४९ मतदारांच्या बोटावर शाई लावण्यात येणार आहे. एकदा बोटावर लावण्यात आलेली शाई कमीत कमी महिनाभर पुसली जात नाही. लोकसभा निवडणुकीसाठी ज्यांनी मतदान केले, आता त्यांच्या बोटावरील शाई मिटली आहे. या शाईमुळे बोगस मतदानाला आळा बसला आहे. 

बोटावर शाईने आखली जाते उभी रेषा- २00४ मधील निवडणुकीच्यावेळी मतदान करणाºया मतदारांच्या बोटावर निळ्या शाईचा केवळ एक ठिपका लावण्यात येत होता. मात्र २00६ मध्ये निवडणूक आयोगाने ठिपक्याऐवजी उभी रेषा आखण्याचे निर्देश दिले. तेव्हापासून अर्ध्या नखावर व अर्ध्या बोटाच्या कातडीवर उभी रेषा मारली जात आहे. त्यामुळे आता शाई जास्त लागत आहे. 

१९६२ च्या निवडणुकीत पहिल्यांदा शाईचा वापर- देशात सर्वप्रथम १९६२ च्या लोकसभा निवडणुकीत मतदान करणाºया मतदारांच्या बोटावर शाई लावण्यात आली होती. तेव्हापासून सर्व निवडणुकीत शाईचा वापर करण्यात येत आहे. - खास मतदानावेळी वापरण्यात येणारी ही शाई म्हैसूर येथील एका वॉर्निश कंपनीत तयार करण्यात येते. भारतात उत्पादित होणाºया या शाईचा वापर २५ देश त्यांच्या निवडणुकीत करीत असतात. 

बाटलीत १0 मिली असते शाई- एका बाटलीत साधारणपणे १0 मिली निळी शाई असते. ३५0 मतदारांच्या बोटावर एका बाटलीतून शाई लावतात. विधानसभेसाठी ३४ लाख ३४ हजार ५४९ मतदारांच्या बोटावर शाई लावण्यात येणार आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकVotingमतदानSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय