भाजपच्या ४६ कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
By राकेश कदम | Updated: February 15, 2024 20:14 IST2024-02-15T20:13:52+5:302024-02-15T20:14:11+5:30
सेवादल प्रदेशाध्यक्ष चाकोते यांचे प्रत्युत्तर.

भाजपच्या ४६ कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
सोलापूर : काँग्रेसच्या चाकोते कुटुंबातील रंजीता चाकोते यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. या भाजप प्रवेशाला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष सुदिप चाकोते यांनी गुरुवारी शहर उत्तर मतदारसंघातील ४६ भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश करुन घेतला.
शहर उत्तर मतदारसंघातील शेळगी येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी माजी आमदार विश्वनाथ चाकोते, प्रदेशाध्यक्ष यंग ब्रिगेड सुदीप चाकोते, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, केदार उंबरजेच यांची प्रमुख उपस्थिती होती. सुदिप चाकोते म्हणाले, जिल्ह्यातील भाजप नेते विकासकामे करण्यात कमी पडले आहेत. त्यांनी केवळ लोकांची घरे फोडण्याचे काम सुरू केले आहे. ही घरे फोडून त्यांना लोकसभा निवडणुकीत मतदान होईल असे वाटते, असे होणार नाही. कारण जनता कंटाळली आहे. ही जनताच भाजपला प्रत्युत्तर देईल. भाजपचे शेळगी भागातील कार्यकर्ते अनेक दिवसांपासून काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक होते. या सर्वांचा प्रवेश आम्ही करुन घेतला आहे. आगामी काळात आणखी काही कार्यकर्ते काँग्रेसमध्ये दाखल होतील, असेही त्यांनी सांगितले.