शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यात अपघातांचे ४४ ब्लॅक स्पॉट; गतवर्षी ६५१ जणांचा बळी !

By appasaheb.patil | Updated: February 5, 2019 13:06 IST

आप्पासाहेब पाटील  सोलापूर : अपघातग्रस्त स्थळांची माहिती वाहनचालकांना नसल्याने मागील वर्षभरात १ हजार २८८ अपघातात ६५१ जणांचा मृत्यू तर ...

ठळक मुद्देवाहतुकीच्या नियमांकडे वाहनधारकांचे दुर्लक्षअपघात क्षेत्र कमी करण्यासाठी आरटीओ, पोलीस यंत्रणा लागली कामाला

आप्पासाहेब पाटील 

सोलापूर : अपघातग्रस्त स्थळांची माहिती वाहनचालकांना नसल्याने मागील वर्षभरात १ हजार २८८ अपघातात ६५१ जणांचा मृत्यू तर ८०१ जण गंभीर जखमी झाले. शहर व ग्रामीण भागातील वाढते अपघात कमी करण्यासाठी जिल्ह्यातील अपघातप्रवण स्थळांचे (ब्लॅक स्पॉट) उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात अपघात व जखमींच्या संख्येवरून जिल्ह्यात एकूण ४४ ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली.

जिल्ह्यातील एकूण ४४ ब्लॅक स्पॉट असल्याचे आढळल्यानंतर त्यांचा अहवाल राज्याच्या परिवहन विभागासह केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाला पाठविण्यात आला आहे. या स्पॉटचे जिओ टॅगिंग करण्यात आले असून, प्रवाशांना त्याची माहिती गुगल मॅपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे़ केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने जिल्हा पातळीवर रस्त्यावरील ब्लॅक स्पॉटची यादी नव्याने तयार करण्याचे निर्देश राज्याच्या परिवहन आयुक्तांनी दिले होते. 

या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्टÑ रस्ते विकास महामंडळ व रस्ते बांधणीत सहभागी स्थानिक स्वराज्य संस्थेकडे याची जबाबदारी देण्यात आली होती़ त्यानुसार उपप्रादेशिक परिवहन विभागाने सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस विभागाशी संपर्क साधून जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट निश्चित केले.

या ठिकाणी होतात सर्वाधिक अपघात (ब्लॅक स्पॉट)

  • - सोलापूर शहर पोलीस हद्दीतील केगाव, जुना पुणे नाका, बसस्थानक, मार्केट यार्ड, जुना विजापूर नाका, कंबर तलाव, सोरेगाव चौक तर पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत ग्रामीण हद्दीत पाकणी फाटा ते सोलापूर ते पुणे, चिंचोळी काटी, भीमानगर हॉटेल प्राची, वाघोली शिवार, कुरूल ते परमेश्वर पिंपरी, कामती ते सरकोली या ठिकाणी सर्वाधिक प्रमाणात अपघात होतात, असे सांगण्यात आले आहे़ म्हणून ही ठिकाणे ब्लॅक स्पॉटच्या यादीत समाविष्ट आहेत़

निधीसाठी विभागांचे शासनाकडे प्रस्ताव 

  • - ब्लॅक स्पॉटच्या अहवालामध्ये दीर्घकालीन व अल्पकालीन अशा उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत़ या उपाययोजना पूर्ण करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे़ हा निधी मिळावा, यासाठी प्रत्येक विभागाने खर्चाचा अंदाजे अहवाल तयार करून तो निधी त्वरित मिळावा यासाठी त्या - त्या विभागाने शासनाकडे पाठविण्यास सांगण्यात आले आहे़ 

या निकषानुसार ठरली ब्लॅक स्पॉट ठिकाणे...

  • - ब्लॅक स्पॉट ठरविण्यासाठी दिलेल्या निकषांप्रमाणे रस्त्यावरील साधारणत: ५०० मीटरचे तुकडे व जेथे मागील दोन-तीन वर्षांत झालेले अपघात, त्यातील जखमी व मृतांची संख्या यावरून हे ब्लॉक स्पॉट निश्चित करण्यात आले. या निकषानुसारच पोलीस ठाण्यात अपघाताच्या स्थळांबाबत असलेल्या नोंदी आणि त्या ठिकाणी झालेली जीवितहानी, जखमींची संख्या यांचा अभ्यास करून ब्लॅक स्पॉटची निवड करण्यात आली. ही स्थळे निवडल्यानंतर वाढत्या अपघातांना प्रतिबंध लावण्यासाठी ब्लॅक स्पॉटवर दीर्घकालीन व तात्पुरत्या उपाययोजनाही सुचविण्यात आल्या असल्याचे परिवहन विभागाने सांगितले़ 
टॅग्स :Solapurसोलापूरroad safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघात