विनानंबरच्या वाहनासह ४२ हजारांची वाळू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:22 IST2020-12-22T04:22:13+5:302020-12-22T04:22:13+5:30
दिवशी दुधनी येथील सिनूर चौकात एक वाहन वाळू भरून जात असल्याची खबर अक्कलकोट पोलिसांना मिळाली. त्यांनी धाड कली असता ...

विनानंबरच्या वाहनासह ४२ हजारांची वाळू जप्त
दिवशी दुधनी येथील सिनूर चौकात एक वाहन वाळू भरून जात असल्याची खबर अक्कलकोट पोलिसांना मिळाली. त्यांनी धाड कली असता ४२ हजार किमतीची सहा ब्रास वाळू होती. चौकशीत चालकाचे नाव महातू संगन्ना दुपदे (रा. गोब्बूर, ता. अफझलपूर, जि. कलबुर्गी) सांगण्यात आले. पोलिसांनी वाळूसह वाहनांचा मिळून २५ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपास पोलीस निरीक्षक विजय जाधव करीत आहेत.
तडवळमध्येही छापा
तडवळ येथेही पिकअपमधून वाळू वाहतूक होत असताना पोलिसांनी छापा टाकून वाळूसह १ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, कलशेट्टी, वार यांनी टाकला. याबाबत भाऊकांत सरवदे यांनी फिर्यादी दिली असून, तपास पोलीस कलशेट्टी करीत आहेत.
----