सोलापुरातील ४० युवकांनी घेतली रामदीक्षा; ५ दिवस अनुभवणार वनवासी जीवन
By काशिनाथ वाघमारे | Updated: March 28, 2023 16:04 IST2023-03-28T16:03:20+5:302023-03-28T16:04:04+5:30
अशोक चौकातील गीता मंदिरात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांचे ४० युवक एकत्र येऊन हा उपक्रम आखला.

सोलापुरातील ४० युवकांनी घेतली रामदीक्षा; ५ दिवस अनुभवणार वनवासी जीवन
काशिनाथ वाघमारे
सोलापूर : राम नवमीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील ४० युवकांनी रामदीक्षा घेतली आहे. दीक्षा काळातील पाच दिवस हे तरुण वनवासी वृत्तीने जगणार आहेत. तसेच एका मंदिरात पाच दिवस स्वत:चा स्वयंपाक स्वत:च चुलीवर करुन अन्नग्रहण करुन श्रीरामांचा वनवास जाणून घेण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.
अशोक चौकातील गीता मंदिरात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांचे ४० युवक एकत्र येऊन हा उपक्रम आखला. बजरंग दलाचे उपाध्यक्ष रवीकुमार बोल्ली आणि विश्व हिंदू परिषदेचे सोलापूर, पंढरपूर विभागमंत्री जयदेव सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली या ४० युवकांनी कुटूंबापासून दूर राहून ही दीक्षा घेतली. ३० मार्च रोजी श्रीरामनवमी असून या दिवसी दीक्षा समाप्ती असणार आहे.
२०१८ पासून रामदीक्षा
शहरात सुख सुविधांमध्ये जगणा-या तरुणाईला श्रीरामांचा वनवास कसा होता, का होता हे थोडक्यात जाणून देण्यासाठी २०१८ पसून हा अभिनव उपक्रम बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद राबवित आहे. यंदा उपक्रमाचे सहावे वर्ष असून जनतेला आरोग्य लाभावं आणि दारिद्र्य निर्मूलन व्हावं हाही एक संकल्प त्यामागे असल्याचे जयदेव सुरवसे यांनी सांगितले.