कत्तलखान्याकडे निघालेल्या ४० जनावरांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:16 IST2021-06-28T04:16:50+5:302021-06-28T04:16:50+5:30

सांगोला : ३५ ते ४० लहान-मोठी जनावरे कत्तलखान्याकडे घेऊन जाणारा पिकअप सांगोला पोलिसांनी पकडला. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ...

40 animals released from slaughterhouse | कत्तलखान्याकडे निघालेल्या ४० जनावरांची सुटका

कत्तलखान्याकडे निघालेल्या ४० जनावरांची सुटका

सांगोला : ३५ ते ४० लहान-मोठी जनावरे कत्तलखान्याकडे घेऊन जाणारा पिकअप सांगोला पोलिसांनी पकडला. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास महूद (ता. सांगोला) येथे ही कारवाई झाली. याप्रकरणी पोलिसांनी वाहन मालक नजीर सौदागर व चालक नितीन शांतीलाल ननवरे (रा. अकलूज, ता. माळशिरस) यांना ताब्यात घेतले आहे.

पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी ही कामगिरी केली. पोलीस हेड कॉन्स्टेबल बापूसाहेब झोळ, पोलीस नाईक हजरत पठाण, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे व पोलीस कॉन्स्टेबल अमर पाटील हे रविवारी महूद हद्दीत गस्त घालत होते.

त्यांना एका वाहनातून (एमएच ४८ /टी ८६९६) ही जनावरे वाहनातून महूदमार्गे अकलूजकडे निघाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी महूद-अकलूज चौकात सापळा रचून पिकअप पकडला. पोलिसांनी हौद्याची तपासणी केली असता दाटीवाटीने भरलेली जनावरे आढळून आली. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: 40 animals released from slaughterhouse