४ हजारांची वाळू, १ लाखाचा टेम्पो पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:17 IST2021-05-31T04:17:21+5:302021-05-31T04:17:21+5:30

पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या आदेशानुसार पोलीस हेडकॉन्स्टेबल हजरत पठाण, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे हे कटफळ दूरक्षेत्र हद्दीत ...

4 thousand sand, 1 lakh tempo caught | ४ हजारांची वाळू, १ लाखाचा टेम्पो पकडला

४ हजारांची वाळू, १ लाखाचा टेम्पो पकडला

पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या आदेशानुसार पोलीस हेडकॉन्स्टेबल हजरत पठाण, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे हे कटफळ दूरक्षेत्र हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. यावेळी दोघे लोटेवाडी ते सांगोला रोडवर म्हसोबा मंदिराजवळ समोरून चारचाकी वाहन येताना दिसले. त्यास इशारा करून थांबविले. पोलिसांनी पाठीमागील हौद्यात पाहिले असता अर्धा ब्रास वाळू भरलेली होती. यावेळी पोलिसांनी सुमारे १ लाखाचा एमएच- १० बीआर- ७६८६ टेम्पोसह ४ हजार रुपयांची अर्धा ब्रास वाळू असा १ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे यांनी रणजित राजेंद्र घाडगे, प्रताप हरिदास पवार, ओंकार मारुती पवार, अभिषेक तानाजी इंगोले (रा. एखतपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: 4 thousand sand, 1 lakh tempo caught