मोटारसायकलला अडकविलेल्या पिशवीतून ४ लाख पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:24 IST2021-09-18T04:24:25+5:302021-09-18T04:24:25+5:30

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनगर येथील लोकनेते कारखान्यावर फिटरचे काम करणारे शंकर राजाराम होनमोटे हे १७ सप्टेंबर ...

4 lakh was snatched from the bag stuck to the motorcycle | मोटारसायकलला अडकविलेल्या पिशवीतून ४ लाख पळविले

मोटारसायकलला अडकविलेल्या पिशवीतून ४ लाख पळविले

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनगर येथील लोकनेते कारखान्यावर फिटरचे काम करणारे शंकर राजाराम होनमोटे हे १७ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजनेचे सुमारास मोहोळ येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये आले. खात्यावर जमा असलेले पॉलिसीचे ३ लाख ९७ हजार रुपये काढले. ही रक्कम घेऊन बाहेर उभे असलेल्या मोटारसायकलला अडकवून निघण्याच्या तयारीत होते. तेव्हा तोंडाला काळी पट्टी बांधलेल्या एका २५ वर्षीय युवकाने तुमचे पैसे पलीकडे पडले आहेत, अशी दिशाभूल केली. दरम्यान पडलेली रक्कम पाहण्यासाठी मोटरसायकलवरून उतरले. होनमोटे हे तिकडे पाहत असतानाच गाडीला अडकवलेली पैशाची पिशवी हातोहात काढून पोबारा केला. याबाबत होनमोटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एका अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने करीत आहेत.

Web Title: 4 lakh was snatched from the bag stuck to the motorcycle