मोहोळच्या मतदार यादीतून वगळली ३९५ बोगस नावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:28 AM2021-06-09T04:28:21+5:302021-06-09T04:28:21+5:30

याबाबत अधिक माहिती अशी की, मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील विविध प्रभागांमध्ये तब्बल ५२८ मतदारांची नावे समाविष्ट करण्यात ...

395 bogus names removed from Mohol voter list | मोहोळच्या मतदार यादीतून वगळली ३९५ बोगस नावे

मोहोळच्या मतदार यादीतून वगळली ३९५ बोगस नावे

Next

याबाबत अधिक माहिती अशी की, मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील विविध प्रभागांमध्ये तब्बल ५२८ मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली होती. त्या समाविष्ट केलेल्या नावाबाबत माजी नगराध्यक्ष रमेश बारस्कर, सतीश क्षीरसागर, अशोक गायकवाड, सोमेश क्षीरसागर आदींसह १६ जणांनी आक्षेप घेत लेखी तक्रार नोंदविली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने निवडणूक शाखेने संबंधित ५२८ मतदारांना नोटिसा देऊन ११ मार्च व १७ मार्च रोजी हरकतींच्या सुनावणीसाठी कागदपत्रांसह बोलावले होते.

४३२ मतदार हे सुनावणीसाठी हजर राहिले नसल्याने त्या मतदारांची संबंधित नावे वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रसिद्धीकरण करण्यात आली होती. त्यामध्ये ४३२ मतदारांपैकी १३३ मतदारांनी सबळ पुरावे समक्ष उपस्थित राहून सादर केले, तर ३९५ मतदारांच्या बाबतीत कोणतेही सबळ पुरावे मुदतीत सादर केले नाहीत. त्यामुळे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी ३९५ मतदारांची नावे संबंधित यादी भागातून वगळण्याबाबत आदेश केला. यामुळे मात्र निवडणुकीच्या तोंडावर राजकीय खळबळ उडाली असून, मोहोळ तालुक्यासह पंढरपूर तालुक्यातील इतर गावांमधील नोंदणी केलेल्या या नावांची मोहोळच्या मतदार यादीतून गळती होणार आहे.

Web Title: 395 bogus names removed from Mohol voter list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.