शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

अभ्यासासाठी सोलापूर जिल्ह्यातील ३७८ मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयांना दान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 12:19 IST

११ जणांचे अवयवदान: देहदानासाठी २५०० जणांची स्वेच्छापत्रे

ठळक मुद्दे गेल्या दोन वर्षात ११ जणांनी अवयवदान केले

बाळासाहेब बोचरे 

सोलापूर: जिल्ह्यात अवयवदान, देहदान, नेत्रदान या क्षेत्राबद्दल चांगली जनजागृती झाली असून लोक आता रक्तदानाप्रमाणे अवयवदान, नेत्रदान, देहदान यासाठी पुढे येऊ लागले असल्याचे चित्र आहे. गेल्या आठ वर्षात ३७८ मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयाला अभ्यासासाठी दान म्हणून मिळाले असून गेल्या दोन वर्षात ११ जणांनी अवयवदान केले आहे. 

ब्रेन डेड रुग्णांचे अवयवदान त्यांच्या नातेवाईकांच्या संमतीने केले जाते. सोलापुरात पाच हॉस्पिटलमध्ये अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याची सोय आहे. आपल्या मृत्यूनंतर आपले अवयव इतरांचे प्राण वाचवू शकतात हे पटल्याने अवयवदानासाठी लोक तयार होत आहेत. नैसर्गिक मृत्यू आलेल्या निरोगी व्यक्तीचा देह हा वैद्यकीय महाविद्यालयात अभ्यासासाठी स्वीकारला जातो. 

सोलापुरात डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व अश्विनी ग्रामीण रुग्णालय कुंभारी येथे ही सोय आहे. या ठिकाणी स्वेच्छापत्रे भरुन घेतली जातात. याशिवाय आठ वर्षांपूर्वी देहांगदान ही संस्था चंदूभाई देढिया यांनी सुरू केली असून, अरुण गोरटे हे सध्या अध्यक्ष आहेत. ही संस्था अवयवदान, देहदान, नेत्रदान, रक्तदान याबाबत जनजागृती करत असून दात्यांची स्वेच्छापत्रेही भरुन घेतली जातात. देहदानाची स्वेच्छापत्रे भरणाºयांची संख्या २५०० च्यावर गेली आहे. गेल्या आठ वर्षात डॉ. वैशंपायन मेडीकलकॉलेजला ३०० जणांनी मृतदेह सुपूर्द केले आहेत. गेल्या दोन वर्षात अश्विनी रुग्णालयाकडे ७८ जणांनी मृतदेह सुपूर्द केले आहेत. 

देहदानाने वाढदिवस साजरा- राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर आगारात वाहक असलेल्या वृषाली राठोड व सुषमा सुरवसे या दोन महिलांपैकी वृषाली यांचा मंगळवार, दि. २८ आॅगस्ट रोजी वाढदिवस होता. त्यादिवशी या दोघींनीही देहांगदान संस्थेत जाऊन देहदान व अवयवदानाची स्वेच्छापत्रे भरून दिली. संस्थेचे अध्यक्ष अरुण गोरटे यांनी त्याबद्दल त्यांचे कौतुक केले. 

आपल्या पतीने देहदानाचा फॉर्म भरला आहे. शिवाय आपल्यानंतर आपल्या देहाचा काहीतरी उपयोग व्हावा, असे वाटले. तसेच आपल्या अवयवामुळे जर कुणाचे प्राण वाचत असतील तर द्यायला काय हरकत आहे, या भावनेने आपण स्वेच्छापत्रे भरली.-सुषमा सुरवसे, महिला वाहक

अंत्यविधीसाठी होणारा खर्च किंवा निसर्गाचा ºहास आणि प्रदूषण याला आळा बसावा, मृत्यूनंतर आपले अवयव किंवा देह अभ्यासासाठी उपलब्ध व्हावा, या उद्देशाने आपण अवयवदान व देहदानास तयार झालो. वाढदिवस असल्याने त्यादिवशी चांगल्या कामाची सुरुवात केली एवढेच. - वृषाली राठोड, महिला वाहक

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटलOrgan donationअवयव दानGovernmentसरकारHealthआरोग्य