सोलापूर जिल्ह्यातील ३५ हजार शेतकºयांनी भरले कृषिपंपांचे वीजबिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 14:02 IST2017-11-21T14:01:00+5:302017-11-21T14:02:25+5:30
महावितरणने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत जिल्ह्यातील ३५ हजारांहून अधिक ग्राहकांनी या महिन्यात कृषिपंपांचे वीजबिल भरले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ३५ हजार शेतकºयांनी भरले कृषिपंपांचे वीजबिल
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २१ : महावितरणने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत जिल्ह्यातील ३५ हजारांहून अधिक ग्राहकांनी या महिन्यात कृषिपंपांचे वीजबिल भरले आहे. महावितरणकडे १४ कोटी ८२ लाख रुपयांची रक्कम बिलांपोटी जमा झाली आहे. त्यातच मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेस ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने कृषिपंपधारकांना थकबाकीमुक्त होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
कृषिपंपधारक शेतकºयांसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार जून-२०१७ चे त्रैमासिक चालू वीजबिल भरून या योजनेत सहभागी होता येणार आहे. मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत ३१ मार्च २०१७ पर्यंत असलेल्या मूळ थकबाकीचा हप्त्यांनी भरणा केल्यास व्याज व दंड माफ केले जाणार आहे. जिल्ह्यातील ३ लाख ४३ हजार १९७ ग्राहकांकडे दोन हजार १९७ कोटी १३ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यातील एक हजार ४०६ कोटी ७३ लाख रुपयांची मूळ थकबाकी दिलेल्या हप्त्यांत चालू वीजबिलांसह भरल्यास ७७२ कोटी ८१ लाख रुपयांचे व्याज व १७ कोटी ५९ लाख रुपयांचा दंड माफ करण्याचा शासनाचा विचार आहे. ज्या कृषिपंपधारकांकडे ३० हजार रुपयांच्या आत थकबाकी आहे, अशा ग्राहकांना ५ सुलभ हफ्ते तर ज्या कृषिपंपधारकांकडे ३० हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी आहे, अशा ग्राहकांना मूळ थकबाकी भरण्यासाठी १० सुलभ हफ्ते मिळणार आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात कृषिपंपांचे बिल भरण्यास शेतकºयांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. ३५ हजार १६५ शेतकºयांनी या महिन्यात १४ कोटी ८२ लाख रुपये कृषिपंपांच्या वीजबिलापोटी भरले आहेत. आता मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेस ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने सर्व शेतकºयांना कृषीपंपांच्या थकबाकीतून मुक्त होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. सर्व कृषिपंपधारकांनी आपले वीजबिल तातडीने भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.