शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

Good News; बार्शी तालुक्यातील ३२ गावांनी कोरोनाला रोखण्यात मिळवलं यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 11:12 AM

लोकमत न्यूज नेटवर्क 

ठळक मुद्देबार्शी शहरात वैद्यकीय सुविधा आणि हॉस्पिटलची संख्या जास्त सर्व खाजगी हॉस्पिटलचे बेड फुल्ल झाले आहेतरुग्ण वाढत असले तरी बाजारातील गर्दी मात्र कमी होताना दिसत नाही

बार्शी : बार्शी शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सुरुवातीला काही ठराविक गावात असलेल्या कोरोना व्हायरसने जवळपास ७५ टक्के तालुका व्यापला आहे. तालुक्यातील १३८ गावांपैकी १०६ गावात कोरोनाने शिरकाव केला आहे. मात्र अद्यापही ३२ गावातील नागरिकांनी कोरोनाला रोखण्यात यश मिळवले आहे.

ही आहेत ती गावेहिंगणी आर, पिंपळगाव देशमुख, पाथरी, पुरी, वाघाचीवाडी, ममदापूर, पांढरी, बेलगाव, भानसळे, वालवड, गोडसेवाडी, बळेवाडी, तावरवाडी, भोर्इंजे, संगमनेर, राऊळगाव, मिरझनपूर, आंबेगाव, अंबाबाईचीवाडी, चिंचखोपण, कासारी, भांडेगाव, निंबळक, यावली, ढोराळे, मुंगशी वा., तुर्कपिंपरी, तांदूळवाडी, सावरगाव, कापशी, भातंबरे, इंदापूर या गावात कोरोनाला ग्रामपंचायत, गावातील आरोग्य सेवक, आशा वर्कर आणि नागरिकांनी योग्य ती काळजी घेतली. यामुळे आतापर्यंत तरी कोरोनाला गावाने रोखले आहे. 

टेस्ट वाढवण्यासाठी प्रयत्नसध्या बार्शी शहर व तालुक्यात दररोज साधारणपणे ७०० ते ७५०  रॅपिड अँटिजेन  टेस्ट केल्या जात आहेत. नगर पालिकेच्या वतीने व्यापाºयांना कोरोना टेस्ट बंधनकारक केलेली आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये १० ते १५ टक्के रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. यामध्ये बºयापैकी  लक्षणे नसलेल्यांचा समावेश आहे. या टेस्ट आणखीन वाढविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अशोक ढगे यांनी सांगितले.

रुग्ण वाढले तरी.. बाजारातील गर्दी होईना कमीबार्शी शहरात वैद्यकीय सुविधा आणि हॉस्पिटलची संख्या जास्त आहे. त्यामुळे भूम, परांडा, वाशी, उस्मानाबाद, कळंब आदी तालुक्यातुन मोठ्या प्रमाणावर रुग्ण कोरोना उपचारासाठी बार्शीत दाखल होत आहेत. त्यामुळे सर्व खाजगी हॉस्पिटलचे बेड फुल्ल झाले आहेत. रुग्ण वाढत असले तरी बाजारातील गर्दी मात्र कमी होताना दिसत नाही.

कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी, लोकांना समूहाने (गर्दी करून) बसण्यासाठी मज्जाव केला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हाय रिस्क ६० वर्षांवरील लोकांची घरोघरी जाऊन नियमित तपासणी करून जनजागृती केली. किरकोळ अपवाद वगळता पुण्या-मुंबईतील लोकांना गावात येऊच दिले नाही. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आर्सेनिक आल्बम ३० चे ग्रा.पं. व रोटरी क्लब असे दोन वेळा वाटप केले. तीन वेळा गावात फवारणी केली. आठवडा बाजार अद्यापही बंदच आहे. गावातील दुकानांनाही वेळा ठरवून दिल्या आहेत. त्या वेळेतच दुकाने उघडली जातात.    - प्रशांत खुने, सरपंच भातंबरे

१०६ गावात झाला शिरकावतालुक्यात सात प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. यात सर्वाधिक २१३ रुग्ण हे वैरागमध्ये तर त्याखालोखाल जामगाव (आ), उपळे (दु.) पिंपळगाव धस या गावात जास्त रुग्ण आढळले आहेत. बार्शी शहरात आजवर १७२३ तर ग्रामीण भागात ११४२ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १८९६ जण बरे झाले. सध्या ३५२ जणांवर विविध कोविड सेंटर आणि हॉस्पिटलमध्ये तर ५०४ बाधितांवर घरी उपचार सुरू आहेत. आजवर तालुक्यात ११३ लोकांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याbarshi-acबार्शी