शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

Good News; ३२ हजार स्टेशन मास्तरांना ५४०० ग्रेड पे मिळणार

By appasaheb.patil | Published: February 28, 2020 11:07 AM

रेल्वे बोर्डाने घेतला निर्णय; सोलापूर विभागातील ४८६ जणांना झाला लाभ

ठळक मुद्देभारतीय रेल्वे खात्यातील स्टेशन मास्टर्स यांच्या मागणीकडे रेल्वे बोर्डाने लक्ष घातले ५ फेबु्रवारी रोजी झालेल्या बैठकीत वेतनश्रेणी वाढविण्यात आली़ उर्वरित मागण्या लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासनवर्षानुवर्षे केलेल्या स्टेशन मास्टर्स यांच्या मागणीला आंदोलनाला यश आले

सोलापूर : भारतीय रेल्वे खात्यातील मध्य, साऊथ, ईस्ट व नॉर्थ अशा ३२ हजार स्टेशन मास्टर्सना ५ हजार ४०० रुपये ग्रेड  पे (वेतनश्रेणी) वाढविण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे़ याबाबतचा आदेश रेल्वे मंत्रालयात आयोजित बैठकीनंतर २५ फेबु्रवारी दुपारी २ वाजता काढण्यात आल्याची माहिती स्टेशन मास्टर्स असोसिएशनचे केंद्रीय कार्यकारिणीचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय चंद्रात्रय व सोलापूर मंडलाध्यक्ष संजीव अर्धापुरे यांनी ‘लोकमत’ ला दिली. 

अखिल भारतीय स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या वतीने भारतीय रेल्वे खात्यात असलेल्या सर्वच स्टेशन मास्तरांची वेतनश्रेणी वाढविण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती़ या मागणीच्या पूर्ततेसाठी स्टेशन मास्तर संघटनेने वर्षानुवर्षे विविध प्रकारचे आंदोलन करून प्रशासनाने लक्ष वेधले़ मागणी मान्य होत नसल्याने स्टेशन मास्टर्स असोसिएशनने २५ फेबु्रवारी रोजी दिल्ली येथै महारॅलीचे आयोजन केले होते़ या रॅलीत रेल्वेतील १० हजार स्टेशन मास्टर्स सहभागी झाले होते.

 दरम्यान, दिल्ली येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आल्यामुळे रेल्वे मंत्रालय परिसरात १४४ कलम लागू करण्यात आले होते़ त्यामुळे पोलिसांनी महारॅली काढू दिली नाही़ महारॅलीत सहभागी झालेल्या स्टेशन मास्टर्स यांचा रोष लक्षात घेता रेल्वे मंत्रालयातील उपमुख्य निदेशक (पे कमिशन) वित्त आयोगाचे सुधा ए़ कुजर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली़ या बैठकीत भारतीय रेल्वेतील स्टेशन मास्टर्स यांना ५ हजार ४०० गे्रड पे (वेतनश्रेणी) वाढविण्याचा निर्णय घेऊन त्याबाबतचा आदेश तत्काळ काढण्यात आला. यावेळी भारतीय रेल्वे स्टेशन मास्टर्स असोसिएशनचे केंद्रीय अध्यक्ष धनंजय चंद्रात्रय, सहसचिव पी़ सुनीलकुमार, आऱ डी़ स्वामी, झोन वित्त सचिव डी़ के़ अरोरा, सोलापूर मंडल अध्यक्ष संजीव अर्धापुरे, सचिव एस़ एऩ सिंग, मोनीकुमारी उपस्थित होते.

रेल्वे स्टेशनवर झाला आनंदोत्सव...- भारतीय रेल्वेचे माजी केंद्रीय अध्यक्ष शिवनपिल्ले याच्या पुण्यतिथीनिमित्त २५ फेबु्रवारी रोजी स्टेशन मास्टर्स असोसिएशनने मागणी दिवस साजरा केला़ या मागणीदिवशी आयोजित बैठकीत स्टेशन मास्टर्स यांना ५ हजार ४०० रुपये  ग्रेड पे(वेतनश्रेणी) लागू झाल्याचे पत्र २५ फेबु्रवारी रोजी दुपारी ४ वाजता सोलापूर मंडल अध्यक्ष संजीव अर्धापुरे यांना प्राप्त होताच सोलापूर रेल्वे स्थानकावर लाडू, पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा केला़ 

या मागण्या अद्याप प्रलंबित़...

  • - सुरक्षा किंवा तणाव भत्ता मिळावा
  • - स्टेशन मास्टर्स संवर्गातील १० टक्के जागा ग्रुप बी अधिकारी पदोन्नती मिळावी 
  • - न्यू पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी
  • - १२ तास कार्यकाळ काम रद्द करून कामाचे तास कमी करावेत
  • - स्टेशन मास्टर्सना सर्व स्टेशनमध्ये विश्रांतीगृहाची व्यवस्था करावी
  • - सर्व स्टेशनवर स्टेशन मास्टर्स पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करावी
  • - भारतीय रेल्वेतील स्टेशन निर्देशकांची नियुक्ती स्टेशन मास्टर्स संवर्गातून करावी
  • - कामाच्या व्याप पाहून अतिरिक्त स्टेशन मास्टर्सची नेमणूक करावी

भारतीय रेल्वे खात्यातील स्टेशन मास्टर्स यांच्या मागणीकडे रेल्वे बोर्डाने लक्ष घातले आहे़ २५ फेबु्रवारी रोजी झालेल्या बैठकीत वेतनश्रेणी वाढविण्यात आली़ उर्वरित मागण्या लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन रेल्वे बोर्डाने दिले आहे़ वर्षानुवर्षे केलेल्या स्टेशन मास्टर्स यांच्या मागणीला आंदोलनाला यश आले आहे़ याचा फायदा देशभरातील ३२ हजार स्टेशन मास्टर्स यांना होणार आहे.- संजीव अर्धापुरेअध्यक्ष - स्टेशन मास्टर्स असोसिएशन, सोलापूर मंडल

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वे