अकलूजच्या घोडेबाजारात मारवाड, पंजाबी नुक्रा जातींसह देशभरातून ३०० जातीवंत घोडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 09:07 IST2025-10-16T09:06:54+5:302025-10-16T09:07:07+5:30
- राजीव लोहकरे लोकमत न्यूज नेटवर्क अकलूज (जि. सोलापूर) : कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात दिवाळीनिमित्त भरविण्यात आलेल्या घोडेबाजारात ...

अकलूजच्या घोडेबाजारात मारवाड, पंजाबी नुक्रा जातींसह देशभरातून ३०० जातीवंत घोडे
- राजीव लोहकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
अकलूज (जि. सोलापूर) : कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात दिवाळीनिमित्त भरविण्यात आलेल्या घोडेबाजारात देशभरातून ३०० जातिवंत घोड्यांची आवक झालेली असून बाजारात आतापर्यंत १२५ घोड्यांच्या विक्रीतून १ कोटी ३० लाखांची उलाढाल झाली आहे.
उत्तर प्रदेश, हरयाणा, बिहार, दिल्ली, बरेली, मारवाड व पंजाबी नुक्रा जातींसह विविध जातींचे अश्व येथे दाखल झाले आहेत. २००९ पूर्वी घोडेबाजार पंढरपूर येथे कार्तिकी वारीला भरत होता. आता हा बाजार दिवाळीत भरविण्यात येतो.
खरेदीच्या व्यवहारात घोड्याचाही फोटो
बाजारात घोड्याची विक्री झाल्यानंतर खरेदी-विक्री व्यवहाराच्या नोंदणीची अधिकृत संगणकीकृत पावती दिली जाते. त्यावर घोड्यासह खरेदीदार व विक्रीदाराचे फोटो, वायद्याच्या तारखा नमूद असतात.
बाजार प्रत्यक्ष दिवाळी पाडव्याला सुरू होत असला तरी त्या अगोदरच व्यापारी अश्व घेऊन येत आहेत. तब्बल १५ एकर जागेमध्ये हा बाजार असून साजशृंगार साधनांच्या दुकानासाठी व्यापाऱ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.