शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

सोलापूर जिल्ह्यातील ३ लाख ४७ हजार नागरिक ‘आधार कार्ड’ विना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 10:47 IST

राजकुमार सारोळे  सोलापूर : जिल्ह्यात आधार नोंदणीचे काम ९२.६६ टक्के झाले असून, अद्याप ७.४४ टक्के लोकांकडे आधार कार्ड नसल्याने ...

ठळक मुद्देमहा ई सेवा केंद्रात आधार कार्ड नोंदणीसाठी १०० रुपये शुल्क जिल्ह्यात ६९ आधार नोंदणी केंदे्र सुरूअद्याप ३ लाख ४७ हजार २६१ लोकांनी आधार कार्डसाठी नोंदणी केलेलीच नाही

राजकुमार सारोळे 

सोलापूर : जिल्ह्यात आधार नोंदणीचे काम ९२.६६ टक्के झाले असून, अद्याप ७.४४ टक्के लोकांकडे आधार कार्ड नसल्याने हे काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. 

राज्य शासनाने आधार नोंदणीचे काम शंभर टक्के पूर्ण करावे असे आदेश जिल्हाधिकाºयांना दिले आहेत. यावर जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आढावा बैठक घेतल्यावर आधार नोंदणीत प्राथमिक शाळेतील विद्यार्थी मागे असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे झेडपीचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय राठोड यांना झेडपी शाळांमधील विद्यार्थ्यांचे आधार नोंदणीचे काम लवकर पूर्ण करावे असे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे प्राथमिक शिक्षणाधिकारी राठोड यांनी जिल्ह्यातील व महापालिका हद्दीतील सर्व प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड बनविण्यासाठी कॅम्प घेण्याबाबत सर्व गटविकास अधिकाºयांना कळविले आहे. 

जिल्ह्याची लोकसंख्या ४७ लाख ३२ हजार २६0 इतकी असून, आत्तापर्यंत ४३ लाख ८४ हजार ९९९ इतक्या नागरिकांनी आपले आधार कार्ड बनवून घेतले आहे. अद्याप ३ लाख ४७ हजार २६१ लोकांनी आधार कार्डसाठी नोंदणी केलेलीच नाही. यात बहुतांश विद्यार्थी असण्याची शक्यता गृहित धरण्यात आली आहे. जिल्ह्यात ६९ आधार नोंदणी केंदे्र सुरू आहेत.

प्राथमिक व माध्यमिक शाळांची संख्या ४ हजार ३४६ इतकी आहे. यातील २ लाख ८२ हजार २४२ इतक्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी राहिली आहे. त्यामुळे गटविकास अधिकाºयांनी शाळानिहाय आधार नोंदणीचा आढावा घ्यावा असे सुचविण्यात आले आहे. शाळांनी विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी करण्यासाठी वेळापत्रक ठरवून विशेष कॅम्प घ्यावेत असे सुचविण्यात आले आहे. यासाठी महा आयटीचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापकांना आधार नोंदणी कीट पुरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी आधार नोंदणी शिबीर घेण्यात येईल तेथे विजेची व्यवस्था करण्याबाबत महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना कळविण्यात आले आहे.

ई सेवामध्ये १०० रु. शुल्कजिल्हाधिकारी कार्यालयाने ठरवून दिलेल्या महा ई सेवा केंद्रात आधार कार्ड नोंदणीसाठी १०० रुपये शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे ज्यांना गरज असेल असेच नागरिक आधार नोंदणीसाठी जात आहेत. खासगी शाळांमधील शिक्षक पालकांना पाल्याचे आधार कार्ड आणण्यास सांगत आहेत. त्यामुळे ७ टक्के काम रखडले आहे. महापालिका स्तर व सेतू कार्यालयात एक केंद्र कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात यावे अशी मागणी पालकांमधून होत आहे. 

जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सर्व शाळांना आधार शिबीर घेण्याबाबत कळविले आहे. शिबीर पूर्णपणे मोफत असून, मुख्याध्यापकांवर जबाबदारी देण्यात आली आहे. नावात बदल व अपग्रेडेशनसाठी मात्र ३0 रुपये शासकीय शुल्क आकारले जाणार आहे.- संजयकुमार राठोड, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

टॅग्स :SolapurसोलापूरAdhar Cardआधार कार्डSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदSchoolशाळा