२४ जि. प. सदस्यांपैकी सात जणांचा राजकारणाला ‘रामराम’

By Admin | Updated: January 24, 2017 19:56 IST2017-01-24T19:56:07+5:302017-01-24T19:56:07+5:30

२४ जि. प. सदस्यांपैकी सात जणांचा राजकारणाला ‘रामराम’

24 district Par. Seven of the members are 'Ram Ram' in politics | २४ जि. प. सदस्यांपैकी सात जणांचा राजकारणाला ‘रामराम’

२४ जि. प. सदस्यांपैकी सात जणांचा राजकारणाला ‘रामराम’

२४ जि. प. सदस्यांपैकी सात जणांचा राजकारणाला ‘रामराम’
शिवानंद फुलारी - अक्कलकोट
वीस वर्षांच्या कालावधीत अक्कलकोट तालुक्यात जिल्हा परिषद सदस्य म्हणून कारभार पाहिलेल्या २४ सदस्यांपैकी सात जणांनी राजकारणाला कायमस्वरूपी सोडचिठ्ठी देत रामराम ठोकला आहे. त्यातील एक जण आमदार, दुसरे एक जण उपाध्यक्षपद भोगले. तिघांना विरोधी पक्षनेत्याची संधी मिळाली असून, एका सदस्याने पक्षनेतेपदाची धुरा सांभाळली आहे. यात काँग्रेस अव्वल स्थानी राहिली असून, भाजप दुसऱ्या तर तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी राहिली आहे.
तालुक्यात १९६७ पासून आजपर्यंत चपळगाव, वागदरी, सलगर, नागणसूर, मंगरूळ, जेऊर असे सहा गट आहेत. सुरुवातीपासून यात काहीच बदल झाला नाही. अपवाद वगळता मंगरूळ, चपळगाव, वागदरी या गटांमध्ये भाजपचा तर सलगर, नागणसूर गटात काँग्रेस तर जेऊर गटावर राष्ट्रवादीची पकड राहिली आहे. भाजपचे बलभीम शिंदे दहिटणे, महादेवी होरगीनमठ तोळणूर, राजकुमार पाटील, कै. पंचप्पा कल्याणशेट्टी, काँग्रेसच्या भाग्यश्री चव्हाण, गुरूबाई बिराजदार, श्रीशैल वरनाळे वागदरी, सोनाबाई शिंगे सलगर, सरूबाई डोंगरीतोट या सात माजी सदस्यांनी राजकारणाला रामराम ठोकला आहे.
सन १९९७ मध्ये स्व. बाबासाहेब तानवडे आमदार होते. तेव्हा भाजपचा बालेकिल्ला असलेल्या वागदरी गटात त्यांचे बंधू दत्तात्रय तानवडे यांना काँग्रेसचे श्रीशैल वरनाळे यांच्याकडून अल्पमताने पराभूत व्हावे लागले. २००२ ते २००७ या कालावधीत चपळगाव गटामध्ये भाजपचे स्व. पंचप्पा कल्याणशेट्टी व काँग्रेसचे कै. काशिनाथ भरमशेट्टी यांच्यात चुरशीने लढत झाली. मतमोजणीत घोळ झाल्याने प्रथम भरमशेट्टींना विजयी घोषित करण्यात आले. काँग्रेसची शहरातून मिरवणूक निघाली. दरम्यान, फेरमतमोजणीत ५० मतांनी कै. पंचप्पा कल्याणशेट्टी विजयी झाले. सन २००७ मध्ये भाजपचे शिवानंद पाटील व राष्ट्रवादीचे मल्लिकार्जुन पाटील यांच्यात जेऊर गटातून लढत झाली. या लक्षवेधी लढतीत राष्ट्रवादीचे मल्लिकार्जुन पाटील हे विजयी झाले. वीस वर्षांत झालेल्या चार निवडणुकांमध्ये काँग्रेसचे १३, भाजप १०, राष्ट्रवादी १ असे सदस्य राहिले आहेत.

-------------------------------------------
हे झाले आमदार अन् सभापती
सन २००७ मध्ये वागदरी गटातून निवडून आलेले भाजपचे सदस्य आनंद तानवडे, सन २०१२ मध्ये निवडून आलेले काँग्रेसचे सदस्य महिबूब मुल्ला, सलगर गटातील शिवानंद बिराजदार या तिघांना जि. प. मध्ये विरोधी पक्षनेता म्हणून काम करता आले. राष्ट्रवादीचे एकमेव सदस्य मल्लिकार्जुन पाटील (जेऊर गट) यांना पक्षनेता होण्याचे भाग्य लाभले. सन १९९७ या कालावधीत जि. प. सदस्य म्हणून निवडून आलेले सिद्रामप्पा पाटील हे जि. प. चे उपाध्यक्ष झाले. २००९ मध्ये भाजपमधून ते तालुक्याचे आमदारही झाले.

---------------------------------------
चार पंचवार्षिकमधील सदस्य
४सन १९९७: सिद्रामप्पा पाटील (भाजप), भारत जाधव (काँग्रेस), बलभीम शिंदे (भाजप), श्रीशैल वरनाळे (काँग्रेस), सोनाबाई शिंगे (काँग्रेस), सरूबाई डोंगरीतोट (काँग्रेस).
४सन २००२: गुरसिद्धप्पा प्रचंडे (भाजप), राजकुमार पाटील (भाजप), पांडुरंग राठोड (काँग्रेस), कै. पंचप्पा कल्याणशेट्टी (भाजप), विजयकुमार ढोपरे (भाजप), आशा इंगळे (काँग्रेस).
४सन २००७: भाग्यश्री चव्हाण (काँग्रेस), आनंद तानवडे (भाजप), मल्लिकार्जुन पाटील (राष्ट्रवादी), काशिनाथ कोडते (भाजप), महादेवी होरगीनमठ (भाजप), गुरूबाई बिराजदार (काँग्रेस).
४सन २०१२: सिंधुबाई सोनकवडे (काँग्रेस), जयश्री गायगवळी (काँग्रेस), चन्नव्वा अरवत (काँग्रेस), महिबुब मुल्ला (काँग्रेस), शिवानंद बिराजदार (काँग्रेस), अभिजित ढोबळे (भाजप-राष्ट्रवादी आघाडी).

Web Title: 24 district Par. Seven of the members are 'Ram Ram' in politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.