१९ गावांतून २२९ अर्ज; बीबी दारफळ, हिप्परग्यात सर्वाधिक अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:29 IST2020-12-30T04:29:49+5:302020-12-30T04:29:49+5:30
आतापर्यंत सेवालालनगर येथील १८, भोगाव २२, हगलूर १४, वांगी १५, बेलाटी १, तिऱ्हे ११, राळेरास ३, एकरुक -तरटगाव ७, ...

१९ गावांतून २२९ अर्ज; बीबी दारफळ, हिप्परग्यात सर्वाधिक अर्ज
आतापर्यंत सेवालालनगर येथील १८, भोगाव २२, हगलूर १४, वांगी १५, बेलाटी १, तिऱ्हे ११, राळेरास ३, एकरुक -तरटगाव ७, खेड ७, भागाईवाडी १०, तळेहिप्परगा ३४, कळमण ३, साखरेवाडी १, बीबी दारफळ ३४, नान्नज २, गुळवंची २२, वडाळा १४, तेलगाव १ याप्रमाणे एकूण २८ उमेदवारांचे २२९ अर्ज दाखल झाले आहेत. हिरज, कोंडी, पाथरी, पडसाळी व होनसळ या गावातून एकही अर्ज दाखल झाला नाही.
--------
ऑनलाइनची ठरली अडचण
इतर मागास व अनुसूचित जातीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी जात पडताळणी कार्यालयाला प्रस्ताव सादर करून करणे बंधनकारक आहे. मात्र सोमवारी रात्रीपासून ऑनलाइन सेवा बंद पडल्याने पुढील प्रक्रिया ठप्प झाली. विविध गावांतील उमेदवारांचे अर्जही ऑनलाइन प्रक्रिया बंद असल्यामुळे दाखल होऊ शकले नाहीत. बुधवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांची गर्दी होणार आहे.
----