बंदी असलेल्या बैलगाडा शर्यतीला जाणार २०१ बैलगाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:26 IST2021-08-19T04:26:57+5:302021-08-19T04:26:57+5:30
देशी गाई जतन करण्यासाठी शेतकऱ्यांना जिवापाड जपलेल्या बैलांना शर्यत चालू झाली तरच जोपासणे शक्य आहे. मात्र, याकडे महाराष्ट्र ...

बंदी असलेल्या बैलगाडा शर्यतीला जाणार २०१ बैलगाड्या
देशी गाई जतन करण्यासाठी शेतकऱ्यांना जिवापाड जपलेल्या बैलांना शर्यत चालू झाली तरच जोपासणे शक्य आहे. मात्र, याकडे महाराष्ट्र सरकार दुर्लक्षित करत असल्याचा निषेध बैठकीत केला. ‘जलीकट्टू’ला बंदी नाही. परंतु, महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीवर बंदी आहे. ही बंदी झुगारून महाराष्ट्रातील शेतकरी व बैलगाडी चालक झरे येथे आयोजित बैलगाडा शर्यत आंदोलनात सहभागी होऊन सरकारला शेतकऱ्यांच्या एकजुटीची ताकद दाखविण्याचा मानस यावेळी व्यक्त केला.
यावेळी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, नागेश वाघमोडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष दादासाहेब खरात, आकाश सिद, माजी नगरसेवक अशोक वाघमोडे, विजय कचरे, महादेव वाघमोडे, भगवान शेंडगे, विशाल कोळी, जयराम सूर्यवंशी, संभाजी वाघमोडे, संजय वाघमोडे, विलास देवकते, मारुती सरगर, गजानन पालवे, सूरज देशमुख, आदी उपस्थित होते.