उत्तर तालुक्यातील १६ गावे झाली कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:15 AM2021-06-11T04:15:48+5:302021-06-11T04:15:48+5:30

उत्तर सोलापूर तालुक्यात एप्रिल-मे महिन्यांत कोरोनाने थैमान घातले होते. काही गावे सोडली तर बहुतेक गावांत दररोज कोरोनाबाधित निघत होते. ...

16 villages in Uttar taluka became corona free | उत्तर तालुक्यातील १६ गावे झाली कोरोनामुक्त

उत्तर तालुक्यातील १६ गावे झाली कोरोनामुक्त

Next

उत्तर सोलापूर तालुक्यात एप्रिल-मे महिन्यांत कोरोनाने थैमान घातले होते. काही गावे सोडली तर बहुतेक गावांत दररोज कोरोनाबाधित निघत होते. मात्र, १५ मे पासून वरचेवर कोरोनाचे रुग्ण कमी होताना दिसत आहे. असे असले तरी वडाळा, रानमसले, बीबीदारफळ, पाकणी, कोंडी, गावडीदारफळ, गुळवंची या गावांत कोरोनाचे रुग्ण निघत आहेत.

-------

ही गावे कोरोनामुक्त

कौठाळी, कळमण, वांगी, भागाईवाडी-शेरेवाडी, शिवणी, मार्डी, होनसळ, राळेरास, बाणेगाव, सेवालालनगर, तिर्हे, कवठे, तेलगाव, पाथरी, समशापूर, भाटेवाडी आदी गावे आज तरी कोरोनामुक्त झाली आहेत.

----

तीन गावे २०० पार

१४ गावांत कोरोनाच्या रुग्णांची भर पडत आहे. वडाळा (२५१), बीबीदारफळ (२४५) व नान्नज (२११) या तीन गावांत दोनशेपेक्षा अधिक रुग्णसंख्या झाली आहे. कळमण (१२१), रानमसले (१०५), पाकणी (१४६), कोंडी (१६२), तिर्हे (११०), मार्डी (१९९) व तळेहिप्परगा (११०) ही ७ गावे शंभरी पार केली तर कौठाळी (८६), डोणगाव (८९), गावडीदारफळ (७६) व अकोलेकाटी(८५) ही गावे शंभरीजवळ आली आहेत.

----

तालुक्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत. काही गावांत ब-याच दिवसांपासून रुग्ण आढळले नाहीत. असे असले तरी काही गावांत रुग्ण वाढतच आहेत. यासाठी शंभर टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे.

----

- श्रीकांत कुलकर्णी, तालुका वैद्यकीय अधिकारी

----

Web Title: 16 villages in Uttar taluka became corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.