अत्याचारानंतर १३ वर्षाची मुलगी गर्भवती, गुन्हा दाखल; अमरावतीमधील घटना
By रूपेश हेळवे | Updated: April 18, 2023 13:59 IST2023-04-18T13:56:36+5:302023-04-18T13:59:04+5:30
दरम्यान, शाळेला सूट्ट्या लागल्याने पीडिता ही घरी रहायला गेली.

अत्याचारानंतर १३ वर्षाची मुलगी गर्भवती, गुन्हा दाखल; अमरावतीमधील घटना
सोलापूर : तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला हॉस्टेलवरून नेत तिच्यावर अत्याचार करत, तिला गर्भवती केल्याप्रकरणी संग्राम (रा. इंदापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पीडितेने फिर्याद दिली आहे. पीडिता ही शिक्षणासाठी इंदापूर येथील हॉस्टेलवर राहत होती. आरोपीने नातेवाईक असल्याचे सांगून तिला हॉस्टेलवरून बाहेर घेऊन जात तिच्यावर वारंवार अत्याचार केला. या घटनेची माहिती कोणालाही सांगून नको मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे, असे सांगितले. त्यानंतरही त्याने वारंवार अत्याचार केला.
दरम्यान, शाळेला सूट्ट्या लागल्याने पीडिता ही घरी रहायला गेली. दरम्यान, तिचे पोट दुखू लागल्याने तिच्या आईने तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात घेतल्यानंतर ती पाच महिन्याची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, तिला उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी आरोपी संग्राम याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.