शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

वीसपेक्षा कमी बेड असणाऱ्या १३ रुग्णालयांना कोविड उपचार करण्यास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 12:18 IST

महापालिका ः ऑक्सिजनबाबात स्वयंपुर्ण झाल्यास पुन्हा मान्यता देणार

सोलापूर : शहरात पूर्ण रुग्णांवर उपचार करणाऱ्या असणाऱ्या वीस पेक्षा कमी असणाऱ्या रुग्णालयांना उपचार करण्यास मनाई करण्यात आली आहे. छोट्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करणे अवघड होत आहे. तसेच नागरिकांसाठी महापालिका स्वतः शंभर ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळित होत नसल्यामुळे रुग्ण व नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण होते. रुग्ण अत्यवस्थ झाल्यास त्यांना दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जावे लागत होते. यातच बेड न मिळाल्यास अधिक अडचण होत होती. सोलापुरात चार ऑक्सिजन प्लांट असून ते सर्वांनात ऑक्सिजन पुरुवू शकत नाहीत. त्यामुळे कमी बेड असणारे शहरातील १३ हॉस्पीटलची कोविड सेवा पुरविण्याची मान्यता महापालिकेतर्फे रद्द करण्यात आली आहे.

रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा सुरळित झाल्यानंतर परवानगी देण्यात येईल. यासाठी रुग्णालयांनी स्वताचे ऑक्सिजन प्लांट उभे करुन सुरळित ऑक्सिजन पुरवठा केल्यास त्यांना पुन्हा मान्यता देण्यात येणार असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. त्याऐवजी महापालिकेचे काडादी मंगल कार्यालयात १०० बेड ऑक्सिजन सुरु करण्यात येत असून सध्या ४० बेड सुरु करण्यात येत आहे. नागरिकांनी या नव्या हॉस्पीटलमध्ये उपचार घ्यावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.खासगी रुग्णालयात नाराजीऑक्सिजनसाठी आम्ही महापालिकेवर अवलंबून नसून स्वतःच व्यवस्था केली आहे. आम्ही रुग्णांना चांगली सेवा देत असताना महापालिकेने हा निर्णय घेतला असल्याची खंत रुग्णालयांनी व्यक्त केली. यापुढे कोविड रुग्णावर उपचार करू नका असे कोविड कंट्रोल रूमकडून सांगण्यात आले. याविषयी कोणतेही पत्र महापालिकेकडून देण्यात आले नसल्याचे रुग्णालयांकडून सांगण्यात आले.

सध्या ऑक्सीजनचा तुटवडा आहे. ऑक्सीजनचा पुरवठा शाश्वत होत नाही तोपर्यंत छोट्या रुग्णालयांना ऑक्सीजन पुरवठा करणे कठीण आहे. महापालिकेने काडादी मंगल कार्यालयात १०० ऑक्सीजन बेड उपलब्ध करुन दिले आहेत. छोटी रुग्णालये स्वत:हून ऑक्सीजन मिळविण्यास तयार असतील तर त्यांना भविष्यात कोवीड केअर सेंटरची परवानगी मिळू शकते.    - धनराज पांडे, उपायुक्त, मनपा.

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका