शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

जीपसह १२०० लिटर हातभट्टी दारू जप्त; सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

By appasaheb.patil | Updated: October 16, 2022 14:20 IST

जीपच्या मधल्या सिटवर व पाठिमागील हौदात हातभट्टी दारुने भरलेल्या एकूण १३ मोठ्या रबरी ट्युब मिळून आल्या.

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने १५ ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजता मुळेगाव तांडा-सोलापूर रोडवर एका बोलेरो वाहनातून बाराशे लिटर हातभट्टी दारू वाहतूक होत असताना पकडली असून या गुन्ह्यात ५ लाख ६१ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, दिनांक १५ ऑक्टोबर रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मुळेगाव तांडा (ता. दक्षिण सोलापूर) या ठिकाणाहुन एका बोलेरो जीपमधुन अवैध हातभट्टी  दारुची वाहतुक होणार आहे. त्यानुसार निरीक्षक ब विभाग सदानंद मस्करे यांच्या पथकाने मुळेगाव तांडा रोड ते सोलापूर रोडवर सोन्या मारुती पेट्रोल पंपासमोर सापळा लावून  रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जीप क्र. MH-37-A-2227 या जीपला समोरासमोर वाहन आडवे लावून सदर वाहन थांबवले असता वाहनातून दोन इसम उतरुन अंधाराचा फायदा घेवुन पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना एका इसमास पकडले व एक इसम पळून गेला. त्यानंतर अडविलेल्या वाहनाची तपासणी केली असता जीपच्या मधल्या सिटवर व पाठिमागील हौदात हातभट्टी दारुने भरलेल्या एकूण १३ मोठ्या रबरी ट्युब मिळून आल्या. या कारवाईत वाहनातील  पिंटु सोमनाथ राठोड (रा. मुळेगाव तांडा ता. दक्षिण सोलापूर) यास अटक करुन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास निरिक्षक सदानंद मस्करे निरीक्षक हे करत आहेत.

सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक व उप अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली  सदानंद मस्करे निरीक्षक ब विभाग, सहायक  दुय्यम गजानन होळकर, जवान अनिल पांढरे,  इस्माईल गोडिकट यांनी पार पाडली.

टॅग्स :SolapurसोलापूरExcise Departmentउत्पादन शुल्क विभागCrime Newsगुन्हेगारीSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस