राज्यातील ११ कार्यकारी अभियंत्यांना मिळाली पदोन्नती; सोलापूरला आले संजय धनशेट्टी 

By Appasaheb.patil | Updated: July 4, 2024 18:41 IST2024-07-04T18:41:05+5:302024-07-04T18:41:25+5:30

सोलापूर : महाराष्ट्र जीवन प्रधिकरण विभागाने उपअभियंता (स्थापत्य) यांना कार्यकारी अभियंता (स्थापत्य) या पदोन्नतीच्या कोट्यातील नियमित रिक्त पदांवर नियुक्त्या ...

11 executive engineers in the state got promotion; Sanjay Dhanshetty came to Solapur  | राज्यातील ११ कार्यकारी अभियंत्यांना मिळाली पदोन्नती; सोलापूरला आले संजय धनशेट्टी 

राज्यातील ११ कार्यकारी अभियंत्यांना मिळाली पदोन्नती; सोलापूरला आले संजय धनशेट्टी 

सोलापूर : महाराष्ट्र जीवन प्रधिकरण विभागाने उपअभियंता (स्थापत्य) यांना कार्यकारी अभियंता (स्थापत्य) या पदोन्नतीच्या कोट्यातील नियमित रिक्त पदांवर नियुक्त्या पदोन्नतीने दिल्या आहेत. यात राज्यातील ११ कार्यकारी अभियंत्यांचा समावेश आहे. या पदोन्नतीने सोलापूर जिल्हा परिषदेला पूर्णवेळ कार्यकारी अभियंता पदावर अधिकारी मिळाला आहे. 

दरम्यान, महाराष्ट्र जीवन प्रधिकरण उपविभाग क्र. २ सोलापूरचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांची ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, सोलापूर जि.प.सोलापूर येथे पदोन्नतीने बदली झाली आहे. याशिवाय (कंसात बदलीचे ठिकाण) एम.बी.पवार (कोल्हापूर), ए. बी. कुलकर्णी (मुंबई), पी. पी. बावणे (नागपूर), एस. बी. पढयार(नाशिक), एन. एम. राठोड (अकोला), ए.बी.साळुंखे (हिंगोली), एस.पी. वेंगुर्लेकर (पनवेल), एच.बी.चव्हाण (अहमदनगर), ए.एम. आडे (सांगली), एस.जी.चव्हाण (परभणी) यांचीही पदोन्नतीने बदली झाली आहे. या बदली संदर्भातील आदेशावर मुख्य प्रशासकीय अधिकारी दिपाली देशपांडे-सावेडकर यांची सही आहे. संबंधित अधिकार्यांना लवकरात लवकर पदभार घेऊन तसा अहवाल वरिष्ठ पातळीवर सादर करावा असेही आदेशात म्हटले आहे.
 

Web Title: 11 executive engineers in the state got promotion; Sanjay Dhanshetty came to Solapur