शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

छाननीत १0 उमेदवारांचे अर्ज नामंजूर

By admin | Updated: July 24, 2015 20:08 IST

तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या १0 उमेदवारांचे अर्ज नामंजूर झाले. गुरुवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी चित्र स्पष्ट होणार आहे.

 

सोलापूर: तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या १0 उमेदवारांचे अर्ज नामंजूर झाले. गुरुवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी चित्र स्पष्ट होणार आहे.  दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीला चांगलीच रंगत आली असून, इच्छुकांची संख्याही वाढली आहे. आज अर्जांची छाननी होती. तहसीलदार रघुनाथ पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या छाननीत १0 अर्ज नामंजूर झाले. त्यात कुरघोट २, वडगाव-शिरपनहळ्ळी- १, बरुर - १, राजूर- १, तांदुळवाडी- १, नांदणी - ४ अर्जांचा समावेश आहे. तिसरे अपत्य, एकाच प्रभागातून दोन अर्ज आदी कारणाने अर्ज नामंजूर झाले आहेत. छाननीअंती गावानिहाय मंजूर अर्जांची संख्या: हणमगाव २३, होटगी स्टेशन ६६, पिंजारवाडी २३, शिंगडगाव ३७, लिंबीचिंचोळी ९, दिंडूर ३१, कुरघोट २७, वडजी १३, होटगी/सावतखेड ८१, वडगाव/शिरपनहळ्ळी ३0, बरुर ५४, राजूर २७, बोळकवठे/बंदलगी ३८, तांदुळवाडी ४३, मुळेगाव तांडा १६, टाकळी ३८, मद्रे २९, बक्षीहिप्परगे २५, बोरामणी ५५, सादेपूर ३१, हिपळे २१, नांदणी ३५, चिंचपूर १. (प्रतिनिधी) लिंबीचिंचोळी बिनविरोध र८ेु'>च्/र८ेु'>माजी जि. प. सदस्य श्रीशैल नरोळे यांच्या नेतृत्वाखाली लिंबीचिंचोळी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यात आली. ९ जागांसाठी तेवढेच अर्ज दाखल झाले आहेत. नरोळे कुटुंबाचे वर्चस्व या निवडणुकीत कायम राहिले असून, विरोधकांनाही सत्तेत सहभाग मिळाला आहे.  अनु.

जातीचे उमेदवारच नाहीतर वडापूर, निंबर्गी, चिंचपूर आणि वांगी या चार ग्रामपंचायतींच्या प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. चिंचपूरसाठी ओबीसी प्रवर्गातून एकच अर्ज आला असून, तो मंजूर झाल्याने ही निवडणूक अविरोध झाली तर अन्य तीन पोटनिवडणुकीत अनुसूचित जमातीचे अर्ज नसल्याने तिन्ही जागा पुन्हा रिक्त राहणार आहेत.