शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

१० लाखांसाठी शिक्षकाने केला पत्नीचा छळ, नाझरे येथील प्रकार, पतीसह ९ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 13:24 IST

माहेरहून दहा लाख रुपये घेऊन ये म्हणून  छळ केल्याप्रकरणी शिक्षक पतीसह सासरच्या नऊ जणांविरुद्ध  एका उच्चशिक्षित महिलेने फिर्याद दिली.

ठळक मुद्देलग्नात कमी हुंडा दिला आहे, मला नोकरी आहे, कुणीही १५ लाख रुपये हुंडा दिला असता असे म्हणून पत्नी प्रणितास माहेरहून दहा लाख रुपये घेऊन ये म्हणून आरोपी पतीने तिचा छळ केला. परभणी पोलिसांनी विवाहितेच्या पतीस  नाझरे (ता. सांगोला) येथून अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली

सोलापूर : माहेरहून दहा लाख रुपये घेऊन ये म्हणून  छळ केल्याप्रकरणी शिक्षक पतीसह सासरच्या नऊ जणांविरुद्ध  एका उच्चशिक्षित महिलेने फिर्याद दाखल केल्यावरुन परभणी पोलिसांनी विवाहितेच्या पतीस  नाझरे (ता. सांगोला) येथून अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. हा प्रकार ६ जून २०१४ ते १७ डिसेंबर २०१७ दरम्यान घडला. प्रणिता उर्फ सोनी दीपक शिंदे (वय २५, रा. शेखराजूर, ता. पालम, जि. पभरणी) या विवाहितेने  नानलपेठ (जि. परभणी)  पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

या प्रकरणी आरोपी पती दीपक अशोक शिंदे (वय ३२, रा. नाझरे ता. सांगोला, जि. सोलापूर), सासरा अशोक विठ्ठल शिंदे (वय ६२), सासू कोंडाबाई अशोक शिंदे (५४),नणंद श्यामबाला अशोक शिंदे (वय २९), दीर दिनेश अशोक शिंदे (२७),दीर महेश अशोक शिंदे (वय २५, सर्व रा. घनसरगाव, ता. रेणापूर, जि. लातूर),चुलत दीर गोपाळ चंदर शिंदे (वय ४३), चुलत जाऊ मंजू गोपाळ शिंदे (वय ३४, रा. नाझरे, ता. सांगोला, जि. सोलापूर) व लता बालाजी भोसले (वय ३२ रा. मरखेल, ता. देगलूर, जि. नांदेड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पती दिपक शिंदे हा नाझरे येथे एका संस्थेत शिक्षक म्हणून काम करत आहे. लग्नात कमी हुंडा दिला आहे, मला नोकरी आहे, कुणीही १५ लाख रुपये हुंडा दिला असता असे म्हणून पत्नी प्रणितास माहेरहून दहा लाख रुपये घेऊन ये म्हणून आरोपी पतीने तिचा छळ केला. तसेच पती, सासू आणि नणंद व दीर यांनी  मिळून तिला मारहाण करून कोंडून ठेवले. ही बाब प्रणिताने  तिच्या वडिलांना सांगितली. त्यानंतर तिचे आई-वडील आणि मामा हे सासरी येऊन त्यांची समजूत काढली. आताच लग्न केले आहे, तुम्हाला देण्यासाठी पैसे नसल्याचे सांगत मुलीला चांगले नांदवा, अशी विनंती करून निघून गेले. तरीही आरोपींनी प्रणिताचा छळ सुरूच ठेवला.

टॅग्स :SolapurसोलापूरCrimeगुन्हाPoliceपोलिसArrestअटकCourtन्यायालय