शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

उजनीत मागील २४ तासात १ टीएमसी पाणी जमा; उजनी धरणात २७ टक्के पाणीसाठा

By appasaheb.patil | Updated: September 28, 2023 20:00 IST

धरणातून भीमा नदी पात्रात सोडलेला विसर्गही  कमी करून तो ३००० क्युसेक करण्यात आला आहे.

टेंभुर्णी : मागील दोन दिवस पुणे जिल्ह्यातील पश्चिम घाट माथ्यावर झालेल्या दमदार पावसामुळे बंडगार्डन व दौंड येथून येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ झाल्याने उजनी धरणाचीपाणी पातळी झपाट्याने वाढत असून मागील २४ तासात १ टीएमसी पाणी जमा झाले आहे. धरणाची टक्केवारीही २७ झाली आहे. तर एकूण जलसाठा ७८ टीएमसी एवढा झाला आहे. धरणातून भीमा नदी पात्रात सोडलेला विसर्गही  कमी करून तो ३००० क्युसेक करण्यात आला आहे.

उजनी धरणाच्या वरील बाजूसस असलेल्या १९ पैकी ११ धरणे शंभर टक्के भरले आहेत तर ४ धरणे ९०% च्या पुढे गेली आहेत. खडकवासला धरणही ८५ टक्के भरले आहे. त्यामुळे वरील पिंपळजोगे, वडज, डिंभे, कळमोडी, चासकमान, भामाआसखेड, वडिवळे, आंध्रा व कासारसाई या १० धरणातून १०८०५ क्युसेकने  पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बंडगार्डन येथून येणाऱ्या विसर्गात  वाढ होऊन तो ११०६१ क्युसेक तर दौंड येथून येणारा विसर्ग १८३४९ एवढा झाला आहे . तो आणखी वाढण्याची शक्यता आहे.

जवळपास दोन महिने पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम वाया गेला आहे .आता रब्बीचा हंगाम तरी हाती लागणार का? उजनी धरण भरणार का? या चिंतेत शेतकरी असताना मागील चार-पाच दिवसापासून सोलापूर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यातच उजनी धरणाची पाणी पातळी संथ गतीने का होईना वाढत असल्याने उजनी लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

उजनी धरणास २८ सप्टेंबर रोजी ४३ वर्षे झाले असून ४४ व्या वर्षात पदार्पण केले आहे. मागील ४३ वर्षात उजनी धरण 32 वेळा शंभर टक्के भरले आहे. चालू वर्षी ते शंभर टक्के भरणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

धरणाची सद्यस्थिती - - एकूण पाणी पातळी ४९२.९२०मीटर - एकूण जलसाठा ७८ टीएमसी - उपयुक्त साठा १४.३९ टीएमसी - टक्केवारी  २६.८७- बंडगार्डन ११०६१ क्युसेक  - दौंड  १८३४९ क्युसेक

टॅग्स :SolapurसोलापूरDamधरणWaterपाणीRainपाऊस