'होम व्होटिंग' साठी १ लाख ६ हजार मतदारांनी दिला नकार; निवडणूक कार्यालयाची माहिती

By बाळकृष्ण दोड्डी | Published: April 21, 2024 05:22 PM2024-04-21T17:22:01+5:302024-04-21T17:22:37+5:30

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ८५ पार केलेल्या वृद्ध मतदारांना 'होम व्होटिंग'चा अधिकार मिळाला आहे. अशा ८५ पुढील मतदारांच्या घरी निवडणूक कार्यालयाचे प्रतिनिधी मतपत्रिका घेऊन जातील.

1 lakh 6 thousand voters refused for 'home voting'; Election Office Information | 'होम व्होटिंग' साठी १ लाख ६ हजार मतदारांनी दिला नकार; निवडणूक कार्यालयाची माहिती

'होम व्होटिंग' साठी १ लाख ६ हजार मतदारांनी दिला नकार; निवडणूक कार्यालयाची माहिती

सोलापूर : ज्या मतदारांचे वय ८५ प्लस आहे, अशा मतदारांना घरीच मतदानाचा विशेष अधिकार मिळाला आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनूसार बुथ लेव्हल ऑफिसर अर्थात बीएलओंनी घरोघरी जाऊन अशा मतदारांचा सर्व्हे केला. यात २ हजार ९३० मतदारांनी घरी मतदान करण्याची इच्छा व्यक्त केली. उर्वरित १ लाख ६ हजार मतदारांनी मतदान केंद्रात जावून मतदान करण्यास सक्षम असल्याचे अधिकाऱ्यांना कळवले.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ८५ पार केलेल्या वृद्ध मतदारांना 'होम व्होटिंग'चा अधिकार मिळाला आहे.
अशा ८५ पुढील मतदारांच्या घरी निवडणूक कार्यालयाचे प्रतिनिधी मतपत्रिका घेऊन जातील.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात असे एक लाख ९ हजार १६२ मतदार आहेत. यापैकी २ हजार ९३० मतदारांची नोंदणी झाल्याने त्यांच्याच घरी निवडणूक कार्यालयाचे तीन कर्मचारी मतपत्रिका घेऊन जातील. घरीच मतदान करून घेतील. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिली आहे.

Web Title: 1 lakh 6 thousand voters refused for 'home voting'; Election Office Information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.