शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 19:21 IST

झोमॅटोच्या एका डिलिव्हरी बॉयसोबत अशीच एक हृदयस्पर्शी घटना घडली. अगदी झक्कास पद्धतीने डिलिव्हरी बॉयचा वाढदिवस साजरा झाला आहे.

आजच्या काळात प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त असताना काही लोक असे आहेत जे आपल्या छोट्या छोट्या गोष्टींनी कोणाच्या तरी आयुष्यात खूप आनंद आणतात. झोमॅटोच्या एका डिलिव्हरी बॉयसोबत अशीच एक हृदयस्पर्शी घटना घडली. अगदी झक्कास पद्धतीने डिलिव्हरी बॉयचा वाढदिवस साजरा झाला आहे. जेव्हा झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय ऑर्डर पोहोचवण्यासाठी गेला आणि तिथे उपस्थित असलेले काही लोक हसतमुखाने त्याची वाट पाहत होते. 

खरं तर हे ओळखीचे लोक नसून काही ग्राहक होते ज्यांनी या डिलिव्हरी बॉयसाठी स्पेशल सरप्राईज बर्थडे पार्टीचा प्लॅन केला होता. झोमॅटो डिलिव्हरी बॉय जेवण घेऊन येताच लोकांनी त्याला घेरलं आणि "हॅपी बर्थडे" चं गाणं गात त्याचं जोरदार स्वागत केलं. या खास क्षणाचा व्हिडीओ कृष्णा रतनानी नावाच्या एका युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

सोशल मीडियावर तुफान व्हायरल होणाऱ्या या ज्यामध्ये डिलिव्हरी बॉय भावूक होताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये त्याच्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला, काही क्षणांसाठी तो आपलं काम विसरला आणि त्याला त्या कुटुंबाचा आपण भाग असल्यासारखं वाटू लागलं. या भावनिक पोस्टने सोशल मीडियावर लोकांची मनं जिंकली आहेत. 

लोकांनी कमेंटमध्ये या छोट्या हृदयस्पर्शी क्षणाचं भरभरून कौतुक केलं. एका युजरने लिहिलं की, "आपल्याला असं जग हवं आहे आणि त्यासाठी आपल्याला स्वतःला बदलावं लागेल." "कदाचित त्याला हे अपेक्षित नव्हतं, पण हा क्षण त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा होता.", "तुम्ही लोकांनी त्याचा दिवस नाही तर त्याचं आयुष्य सावरलंय" असं विविध लोकांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलZomatoझोमॅटोViral Videoव्हायरल व्हिडिओSocial Mediaसोशल मीडिया