Tik Tok साठी स्टंटबाजी पडली महागात, मानेवर पडून तरूणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 04:48 PM2019-06-26T16:48:26+5:302019-06-26T16:49:11+5:30

अनेकजण सिनेमात हिरो जे स्टंट करतात ते करण्याचा प्रयत्न करतात. पण हे समजून घेतलं पाहिजे की, हे सिनेमातील हिरो सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन एक्सपर्टच्या मार्गदर्शनात असे स्टंट करतात.

Youth in Karnataka who injured spinal cord in viral tiktok video, dies | Tik Tok साठी स्टंटबाजी पडली महागात, मानेवर पडून तरूणाचा मृत्यू

Tik Tok साठी स्टंटबाजी पडली महागात, मानेवर पडून तरूणाचा मृत्यू

Next

अनेकजण सिनेमात हिरो जे स्टंट करतात ते करण्याचा प्रयत्न करतात. पण हे समजून घेतलं पाहिजे की, हे सिनेमातील हिरो सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन एक्सपर्टच्या मार्गदर्शनात असे स्टंट करतात. तेव्हा ते परफेक्ट होतात. पण सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेता स्टंट केले तर अपघात होणार हे ठरलेलं आहे. अशीच काहिशी घटना कर्नाटकात एका २२ वर्षीय तरूणासोबत घडली आहे. स्टंट करताना तो मानेवर पडला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.

१५ जून रोजी ही घटना घडली. कर्नाटकच्या तुमकुरू जिल्ह्यात राहणारा कुमारस्वामी मित्रांसोबत मैदानात फिरत होता. तेव्हाच त्याला टिकटॉक व्हिडीओ करण्याची सुचलं. एका मित्राने मोबाइक पकडला, दुसरा कुमारला स्टंटमध्ये मदत करण्यासाठी उभा राहिला. हा व्हिडीओ स्लो मोशनमध्ये शूट केला जात होता.

कुमारने बॅकफ्लिप घेण्यासाठी मित्राच्या हातावरून उडी घेतली खरी, पण जमिनीवर पडला तेव्हा तो मानेवर पडला. याने त्याचा पाठीचा कणा मोडला. मित्रांनी त्याला लगेच रुग्णालायता नेलं, तिथे तो ८ दिवस मृत्युशी झुंज देत होता, पण त्याचा मृत्यू झाला.

एकटाच होता घर चालवणारा

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, कुमारस्वामीच्या परिवारातील लोकांनी सांगितले की, त्याच्याकडे स्वत:चा स्मार्टफोनही नव्हता. त्याचे मित्रच व्हिडीओ शूट करत होते. ज्यात कुमारचा जीव गेला. २२ वर्षाचा कुमार हा लोकल ऑक्रेस्ट्रामध्ये गायक आणि डान्सर होता. तो घरात कमावणारा एकटाच होता.

Web Title: Youth in Karnataka who injured spinal cord in viral tiktok video, dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.