याचा सुपरफंडु जुगाड लय भारी! बाईक चालवतोय की कार हे तु्म्हाला कळणारच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 06:50 PM2021-07-23T18:50:40+5:302021-07-23T18:56:33+5:30

काही मंडळी इतकी भन्नाट असतात की कशापासूनही जुगाड करतात. यांची जुगाडू वृत्तीच त्यांना फेमस बनवते. अशाच एका सुपरफंडु जुगाडूचा व्हिडिओ समोर आला आहे. फक्त सोशल मिडियावर नाही तर व्हिडिओतही त्याला प्रेक्षकांची दाद मिळतेय.

young man driving bike with car steering, created such bike which feels like car | याचा सुपरफंडु जुगाड लय भारी! बाईक चालवतोय की कार हे तु्म्हाला कळणारच नाही

याचा सुपरफंडु जुगाड लय भारी! बाईक चालवतोय की कार हे तु्म्हाला कळणारच नाही

Next

काही मंडळी इतकी भन्नाट असतात की कशापासूनही जुगाड करतात. यांची जुगाडू वृत्तीच त्यांना फेमस बनवते. अशाच एका सुपरफंडु जुगाडूचा व्हिडिओ समोर आला आहे. फक्त सोशल मिडियावर नाही तर व्हिडिओतही त्याला प्रेक्षकांची दाद मिळतेय.

या तरुणाने आपली दुचाकी चालवताना चारचाकी चालवल्याचा फील घेण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. त्यानं आपल्या दुचाकीचं हँडल काढून त्याऐवजी कारचं स्टेअरिंग बसवलं आहे. हे स्टेअरिंग हातात पकडून हा तरूण दुचाकी चालवण्याचा मस्त आनंद घेतोय. 

 हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याची खातरजमा अजून झालेली नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. रस्त्यावरून या तरुणाच्या आजूबाजूने चाललेल्या वाहनचालकांना या जुगाडू वाहनाबाबत त्याच्याशी बोलण्याचा मोह आवरत नाही. मात्र त्यांच्या प्रश्नांना त्रोटक उत्तरं देऊन हा तरुण आपल्याच धुंदीत गाडी चालवत राहतो.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: young man driving bike with car steering, created such bike which feels like car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app