बापरे! लहान मुलांना लॉलीपॉप देणं पडू शकतं महागात; चिमुकलीच्या जीभेची झाली भयंकर अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 16:31 IST2021-11-02T16:20:32+5:302021-11-02T16:31:04+5:30

Girl tongue burnt by acidic lollipop : एका चिमुकलीसोबत लॉलीपॉप खाल्ल्यानंतर धक्कादायक घटना घडली. तिच्या जीभेची भयंकर अवस्था झाली आहे. 

young girl tongue burnt by acidic lollipop got bad blisters see photos | बापरे! लहान मुलांना लॉलीपॉप देणं पडू शकतं महागात; चिमुकलीच्या जीभेची झाली भयंकर अवस्था

बापरे! लहान मुलांना लॉलीपॉप देणं पडू शकतं महागात; चिमुकलीच्या जीभेची झाली भयंकर अवस्था

लहान मुलांना लॉलीपॉप खाणं प्रचंड आवडतं. कित्येकवेळा ते लॉलीपॉपसाठी हट्ट करतात. लहान मुलांना नेहमीच घरच्यांकडून लॉलीपॉप खाल्ल्याने दात किडतात असं सांगितलं जातं. पण कधीकधी मुलांना लॉलीपाप देणं त्यांच्यासाठी घातक ठरू शकतं. तसेच यामुळे पालकांच्या देखील चिंतेत भर पडू शकते. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका चिमुकलीसोबत लॉलीपॉप खाल्ल्यानंतर धक्कादायक घटना घडली. तिच्या जीभेची भयंकर अवस्था झाली आहे. 

चाइल्ड सेफ्टी एज्यूकेटर (Child Safety Educator) निक्की जरकट्सने (Nikki Jurcuts) सोशल मीडियावर एका महिलेची पोस्ट शेअर केली आहे. महिलेने निक्कीला आपल्या मुलीचा एक फोटो पाठवला. यात तिच्या लहान मुलीची जीभ बाहेर आलेली होती आणि यावर भयंकर जखम झाली होती. चिमुकलीच्या डोळ्यांतून पाणी येत होतं. हे पाहून असं वाटत होतं, की तिला भरपूर वेदना होत आहेत. फोटो पाहून निक्की हैराण झाली आणि तिने ती पोस्ट शेअर केली ज्यामध्ये महिलेने तिच्या मुलीची अशी अवस्था कशी झाली हे सांगितलं होतं.

महिलेनं आपल्या पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, तिच्या मोठ्या मुलाकडे एसिडिक लॉलीपॉप (Acidic Lollipop) आहे. ज्याची चव अतिशय तिखट आणि आंबट आहे. या चिमुकलीच्या हाती हे मोठ्या भावाचं लॉलीपॉप लागलं. यानंतर तिने कोणालाही न विचारताच ते खाल्लं. मात्र यामुळे तिच्या जीभेची अत्यंत वाईट अवस्था झाली. ही चिमुकली पळतच आपल्या आईजवळ आली. तिची जीभ पाहून आईलाही मोठा धक्का बसला.

महिलेने आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून इतरांनाही सावध केलं आहे की आपल्या मुलांना असे लॉलीपॉप खाऊ देऊ नका. निक्कीदेखील दोन मुलांची आई असून हा फोटो पाहून ती घाबरली. तिने लोकांना सल्ला दिला की लहान मुलांना एसिडिक लॉलीपॉप नाही दिले पाहिजे. मोठ्यांची ही जबाबदारी आहे की पाच वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांना लॉलीपॉप खाऊ देऊ नये. याचा जीभेवर इतका वाईट परिणाम होत आहे तर पोटाची देखील अवस्था खराब होऊ शकते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: young girl tongue burnt by acidic lollipop got bad blisters see photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.