खेळण्यातली गाडी उचलतात तसे उचलले गाडीला, पिसाळलेला वळू पाहुन तुमचा होईल थरकाप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 18:58 IST2021-08-02T18:52:34+5:302021-08-02T18:58:26+5:30
'रनिंग ऑफ द बुल्स’ या खेळादरम्यान एक वळू एसयुव्ही गाडीची अशी काही तोडफोड करतो की त्या गाडीचा चक्काचूर होऊन जातो.

खेळण्यातली गाडी उचलतात तसे उचलले गाडीला, पिसाळलेला वळू पाहुन तुमचा होईल थरकाप!
खवळलेला वळू पळत येत असेल तर त्याच्यासमोर कुणी चूकूनही येणार नाही पण स्पेनमध्ये अशा खवळलेल्या वळूंना रस्त्यावर सोडले जाते. इतकंच नाही तर त्यांच्यासमोर लोक पळतात. हा एक खेळ असून या खेळाला ‘रनिंग ऑफ द बुल्स’ असं म्हणतात. या खेळादरम्यान एक वळू एसयुव्ही गाडीची अशी काही तोडफोड करतो की त्या गाडीचा चक्काचूर होऊन जातो.
व्हीआयपी कार्स (vipcars) या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यात एक वळू पूर्ण बिथरलाय. तो सैरावैरा पळतोय आणि लोक त्याच्यारजे पाहुनजोराने ओरडत आहेत. लोकांच्या ओरडण्यामुळे तो वळू अधिक बिथरतो आणि वाटेत उभी असलेल्या सुयुव्ही गाडीवर हल्ला करतो. तो गाडीला असे काही धक्के देतो की ते पाहुन तुम्हाला घाम फुटेल. मुख्य म्हणजे त्या गाडीत दोन व्यक्ती बसलेल्या आहेत अन् त्या त्या बिथरलेल्या वळूला भीतीने बघत राहण्याशिवाय काहीच करु शकत नाहीयेत.
हा व्हिडिओ पाहुन लोकांना कमेंट केल्यावाचून राहवत नाहीये. अनेकजण या पळणाऱ्या वळूवर हसत आहेत. एक युजर म्हणतोय करा अजून जनावरांशी मस्ती. तर दुसऱ्या युजरने तर चक्क बाहुबलीतील भल्लालदेवला बोलवा अशी मागणी केलीय.