Yellow sari fame poll official Reena Dwivedi once again viral on internet this time in pink | लिंबू कलरची साडीवाली 'ती' पोलिंग अधिकारी पुन्हा चर्चेत
लिंबू कलरची साडीवाली 'ती' पोलिंग अधिकारी पुन्हा चर्चेत

लखनऊ: लोकसभा निवडणुकीवेळी सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या निवडणूक अधिकारी रिना द्विवेदी पुन्हा चर्चेत आल्या आहेत. मे महिन्यात रिना द्विवेदी यांचे लिंबू कलरच्या साडीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे अवघ्या काही दिवसांमध्ये त्या सेलिब्रिटी झाल्या. यानंतर आज मतदानावेळी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. लखनऊ केंट विधानसभा मतदारसंघात आज पोटनिवडणूक पार पडली. यावेळी अनेक मतदार केंद्रांवर फारशा रांगा नव्हत्या. मात्र रिना द्विवेदी कर्तव्य बजावत असलेल्या मतदान केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळत होती. रिना द्विवेदी लखनऊ केंट विधानसभा मतदारसंघातल्या कृष्णा नगर येथील महानगर इंटर कॉलेजमध्ये उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी गुलाबी साडी परिधान केली होती. मतदान केल्यानंतर अनेक मतदारांनी रिना यांच्यासोबत सेल्फी काढले. लोकसभा निवडणुकीवेळी कर्तव्य बजावत असताना रिना द्विवेदी सोशल मीडियावर चर्चेत आल्या. त्यांचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. रिना स्वत:देखील सोशल मीडियावर सक्रीय असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांचा एक टिकटॉक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्या डान्स करताना दिसत होत्या. त्यांच्या व्हिडीओला युट्यूबवरदेखील खूप हिट्स मिळाले होते. लिंबू कलरची साडी आणि काळा गॉगल लावलेल्या रिना द्विवेदी यांचे फोटो सहा महिन्यांपूर्वी व्हायरल झाल्यानंतर त्या बॉसमध्ये दिसणार अशी चर्चा सुरू झाली होती. 
 


Web Title: Yellow sari fame poll official Reena Dwivedi once again viral on internet this time in pink
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.