शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

Video : जेव्हा डोनाल्ड ट्रंप यांनी WWEच्या 'रिंग'मध्ये आयोजकाची धुलाई करत केलं होतं त्याचं टक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 12:36 IST

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक 2020मध्ये होणार आहे. आतापासूनच अमेरिकेमध्ये निवडणूकांचे वारे वाहू लागले आहेत. ह्यूस्टनमध्ये आयोजित 'हाउडी मोदी'मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'अबकी बार, ट्रंप सरकार' हा नारा दिला आहे.

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक 2020मध्ये होणार आहे. आतापासूनच अमेरिकेमध्ये निवडणूकांचे वारे वाहू लागले आहेत. ह्यूस्टनमध्ये आयोजित 'हाउडी मोदी'मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'अबकी बार, ट्रंप सरकार' हा नारा दिला आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजेच, अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रंप यांचा प्रचार सुरू झाला आहे.  याचनिमित्ताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये डोनाल्ड ट्रंप ते WWE या नामांकीत फ्री स्टाइल कुस्ती शोचे आयोजक विन्स मॅकमॅहॉन (Vince McMahon) याला मारहाण करताना दिसत असून त्याचं टक्कल करत आहेत. 

एनडीटिव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रंप सपोटर्स हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत आहेत आणि विरोधकांवर निशाणा साधत सांगत आहेत की, जर या निवडणूकीमध्ये कोणीही ट्रंप यांच्याविरोधात उभं राहिलं तर त्यांची अवस्थाही राष्ट्राध्यक्ष अशीच करतील.' अमेरिकेमध्ये हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. डोनाल्ड ट्रंप यांचा व्हिडीओ डोनाल्ड ट्रंप राष्ट्राध्यक्ष होण्याआधीचा आहे. 2007मध्ये WWE WrestleMania 23 मध्ये डोनाल्ड ट्रंप यांनी वर्ल्ड रेसलिंग एन्टरटेन्मेटचे आयोजक विन्स मॅकमॅहॉन याला मारहाण करत त्याचं टक्कल केलं होतं. Battle of the Billionaires या मॅचमध्ये विन्स मॅकमॅहॉन याने रेसलर उमागावर बोली लावली होती. त्यावेळी त्याच्याविरोधात खेळण्यासाठी डोनाल्ड ट्रंप यांनी बॉबी लॅशलीची निवड केली होती. 

पाहा पूर्ण व्हिडीओ : 

Battle of the Billionaires या बॅटलमधील मॅच फार रंगली होती. तसेच यामध्ये फार चिटींगही झाली होती. मॅचचे रेफरी विन्स मॅकमॅहॉन याचा मुलगा शेन होता. शेनने चिटींग केली त्यामुळे त्याच्याऐवजी स्टोन कोल्ड स्टीव ऑस्टिन यांना रेफरी करण्यात आलं होतं. त्यावेळी डोनाल्ड ट्रंप यांनी निवड केलेल्या बॉबी लॅशली याने मॅच जिंकली. पण एवढ्यावरच थांबतील ते ट्रंप कसले. त्यांनी विन्स मॅकमॅहॉन याला मारहाण करत रिंगमध्ये बसवले आणि त्यांचं टक्कल केलं. जवळपास 12 वर्षांनी हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पWWEडब्लू डब्लू ईInternationalआंतरराष्ट्रीयAmericaअमेरिकाElectionनिवडणूकViral Photosव्हायरल फोटोज्