आरारारारा खतरनाक! साडीतच घेतली इमरजन्सी एक्झिटमधून एंट्री, महिलेच्या जुगाडूपणाचं कौतुक..
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 16:27 IST2021-07-26T16:26:41+5:302021-07-26T16:27:16+5:30
पुलंना त्यांचे पेस्तनकाकाही ट्रेनमध्येच भेटले. महिलावर्गाची तर लोकलकथा संपता संपत नाही. राज्यातून इतरत्र फिरणाऱ्या एक्सप्रेस रेल्वेचे तर आणखीनच मजेशीर किस्से. या रेल्वेचा असाच एक पोट धरुन हसायला लावणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय...

आरारारारा खतरनाक! साडीतच घेतली इमरजन्सी एक्झिटमधून एंट्री, महिलेच्या जुगाडूपणाचं कौतुक..
जगातील सर्वात हॅपनिंग जागा म्हणजे भारतीय रेल्वेचे प्लॅटफॉर्म. इथे काही ना काही तरी मजेशीर किस्से घडतच असतात. या रेल स्टोरींची रेलचेल भरपूर असते. कुणी पाणी आणायला जाताना घसरुन पडत, तर कुणी ट्रेन पकडण्यासाठी धावत असतं. कुणाचे सामान सांभाळता सांभाळता नाकी नऊ आलेले असतात. अशा एक ना अनेक गोष्टी ट्रेनमध्ये घडतात.
पुलंना त्यांचे पेस्तनकाकाही ट्रेनमध्येच भेटले. महिलावर्गाची तर लोकलकथा संपता संपत नाही. राज्यातून इतरत्र फिरणाऱ्या एक्सप्रेस रेल्वेचे तर आणखीनच मजेशीर किस्से. या रेल्वेचा असाच एक पोट धरुन हसायला लावणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय...
भारतीयांना जुगाड कसे करायचे ते सांगायला नकोच. अशाच एका महिलेने रेल्वेत एक जुगाड केलाय. या महिलेने चक्क खिडकीतूनच रेल्वेच्या डब्यात एन्ट्री घेतलीय. रेल्वेला आपतकालीन एक्झिटची खिडकी असते. या खिडकीतून काही संकट ओढवल्यास बाहेर पडण्याची सोय असते. पण या महिलेने या आपत्कालीन एक्झिटलाच आपली एन्ट्री बनवून रेल्वेच्या डब्यात ती घुसली. तिचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतोय.
प्रथम ती आपत्कालीन खिडकिच्या समोर उभी राहते. मग आपली चप्पल त्या खिडकीकडे बसलेल्या व्यक्तीच्या हातात देते. मग हळुहळु आत शिरते. मुख्य म्हणजे ती हे सर्व साडी घातलेली असताना करते. ती आत शिरताना डब्याच्या आतील माणूस तिला हळू हळू आत खेचून घेतो. या व्हिडिओमध्ये असलेले म्युझिकही फारच हसायला लावणारे आहे.
कॅनडा_बी लाईक canada_blike04 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. याला हि बातमी लिहेपर्यंत ४० हजार व्हिव्ज आले आहेत. लोकांना यावर कमेंट करणे आवरता आवरत नाहीये. काहीजण प्रतिक्रियेमध्ये महिलेला उद्देशुन विचारतायत, अहो काकू दरवाजा सापडला नाही का?...तर एकानं म्हटलंय, सीटचा जुगाड चांगला लावलाय.