मुंबईची लोकल म्हणजे मुंबईकरांची खरी 'जीवनवाहिनी' म्हणून ओळखली जाते. याच लोकलमध्ये आज महानवमीच्या दिवशी उत्साहाचे आणि जल्लोषाचे चित्र पाहायला मिळाले. गायक संजू राठोडच्या लोकप्रिय ‘एक नंबर, तुझी कंबर’ या ट्रेंडिंग गाण्यावर एसी लोकलमध्ये महिलांनी डान्स करत आणि गरबा खेळत नवरात्रीचा उत्सव साजरा केला.
सध्या हे गाणं रील्स, शॉर्ट्स आणि इन्स्टाग्रामवर तुफान गाजत आहे. दरम्यान, आज सकाळी ६.३२ वाजता कल्याणहून सीएसएमटी दिशेने येणाऱ्या एसी लोकलमध्ये हा अनोखा सोहळा रंगला. महिला प्रवाशांनी गाण्याच्या तालावर ठेका धरत गरबा खेळला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
@VishooSingh या एक्स अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "मुंबईकरांसाठी लोकल म्हणजे केवळ प्रवास नव्हे, तीच खरी जीवनवाहिनी! आज सकाळी कल्याणहून सुटलेल्या ६.३२ च्या एसी लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष महिलांनी लोकलमध्येच गरबा खेळत आणि 'एक नंबर तुझी कंबर' या गाण्यावर थिरकत उत्सव साजरा केला!"
आज महानवमी आहे, ज्याला दुर्गा नवमी म्हणूनही ओळखले जाते. हा नवरात्रोत्सवाचा शेवटचा दिवस आहे, जो देवी दुर्गाने महिषासुर राक्षसावर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक आहे. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेल्या या पवित्र दिवशी मुंबईकरांनी लोकलमध्ये आपला उत्साह व्यक्त केला.
Web Summary : Mumbai local witnessed Navratri celebrations as women danced to 'Ek Number, Tuzhi Kamar' in an AC local. Passengers traveling from Kalyan to CSMT enjoyed Garba, showcasing festive spirit on Mahanavami, the final day of Navratri.
Web Summary : मुंबई लोकल में नवरात्रि का जश्न देखा गया क्योंकि महिलाओं ने एसी लोकल में 'एक नंबर, तुझी कमर' पर नृत्य किया। कल्याण से सीएसएमटी तक यात्रा करने वाले यात्रियों ने गरबा का आनंद लिया, नवरात्रि के अंतिम दिन महानवमी पर उत्सव की भावना का प्रदर्शन किया।