संपूर्ण कुटुंबच चोर! खरेदीसाठी आलेल्या महिलांनी दुकानात मारला डल्ला; Video तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 19:23 IST2024-12-07T19:22:10+5:302024-12-07T19:23:06+5:30

दोन महिला एका मुलीसोबत कपड्याच्या दुकानात चतुराईने चोरी करताना दिसत आहेत.

woman with her family steals from shop video goes viral | संपूर्ण कुटुंबच चोर! खरेदीसाठी आलेल्या महिलांनी दुकानात मारला डल्ला; Video तुफान व्हायरल

संपूर्ण कुटुंबच चोर! खरेदीसाठी आलेल्या महिलांनी दुकानात मारला डल्ला; Video तुफान व्हायरल

सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन महिला एका मुलीसोबत कपड्याच्या दुकानात चतुराईने चोरी करताना दिसत आहेत. दुकानदार आपल्या कामात व्यस्त असताना, हे संपूर्ण कुटुंब त्याच्या पाठीमागे चोरी करून दुकानदाराची फसवणूक करताना दिसत आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये एक दुकानदार त्याच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांना कपडे दाखवत असल्याचं दिसून येतं. या ग्राहकांमध्ये दोन महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. दुकानदार कपडे काढण्यासाठी मागे वळताच एक महिला दुकानात समोर ठेवलेली पँट काढते आणि शेजारी उभ्या असलेल्या महिलेला देते, त्यानंतर ती बाई पँट गुपचूप एका लहान मुलीला देते, मुलगी ती पँट लपवते. 


ही संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटेजमध्ये या महिलेने आपल्या मुलीच्या मदतीने पँटची चतुराईने चोरी केल्याचं दिसत आहे. महिला ग्राहकाप्रमाणे दुकानात आल्या आणि कपड्यांकडे पाहू लागल्या. यानंतर संधी मिळताच त्यांनी कपडे चोरून तेथून पळ काढला.

हा व्हिडिओ be_harami नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत २.१ मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. अनेकांनी व्हिडिओला लाईकही केलं आहे. लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं...संपूर्ण कुटुंब चोर आहे. तर दुसऱ्या युजरने लिहिले...ती एक महिला आहे आणि ती काहीही करू शकते.
 

Web Title: woman with her family steals from shop video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.