महिलेने फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये फुकट खाण्यासाठी ट्रिक वापरली, पकडली गेली, Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 14:44 IST2023-11-15T14:43:51+5:302023-11-15T14:44:08+5:30
एका फेसबुक पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 40 सेकंदाच्या क्लिपमध्ये ती महिला आपल्या जोडीदाराशी बोलत असताना तिचे केस उपटून अन्नामध्ये मिसळत असल्याचे दिसतेय.

महिलेने फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये फुकट खाण्यासाठी ट्रिक वापरली, पकडली गेली, Video
महागड्या हॉटेलांमध्ये जाऊन जेवणे हे सर्वांनाच हवेहवेसे वाटत असते. परंतू, खिशालाही ते परवडणारे नसते. कारण त्याचे बिल एवढे भारी असते की भरताना डोळे विस्फारू शकतात. यामुळे अनेकजण काही ना काही ट्रिक वापरण्याचा प्रयत्न करतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ही ट्रिक एका महिलेला महागात पडली आहे. या महिलेला बिल भरणे टाळण्य़ासाठी जेवणात केस टाकताना पकडले गेले आहेत. तिची ही करामत सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार ही घटना ब्रिटनमधील आहे. तेथील एका फाईव्ह स्टार रेस्टॉरंटमध्ये महिला तिच्या सोबत इतरांना घेऊन जेवणासाठी पोहोचली होती. तिथे फुकटात जेवण जेवण्यासाठी तिने एक खतरनाक प्लॅन बनविला होता. रेस्टॉरंटला बदनाम करण्याची धमकी देत फुकटात जेवण्याचे तिने ठरविले होते. तिने ऑर्डरही दिली, जेवण आले, तेव्हा या महिलेने त्या जेवणात केस टाकला.
एका फेसबुक पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 40 सेकंदाच्या क्लिपमध्ये ती महिला आपल्या जोडीदाराशी बोलत असताना तिचे केस उपटून अन्नामध्ये मिसळत असल्याचे दिसतेय. ही घटना इंग्लंडमधील प्रसिद्ध रेस्टॉरंट ब्लॅकबर्न मधील आहे. तिला हे करताना रेस्टॉरंट मालकाने पकडले आहे. यामुळे तिचा फुकट खाण्याचा प्लॅन फसला आहे.