दिल्लीमध्ये एक तरुणी रॅपिडो बाइक राइड दरम्यान स्वतःचे शुटिंग करत असतानाच बाइकला अपघात होऊन खाली पडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या जबरदस्त व्हायरल होत आहे. हा व्हडिओ आतापर्यंत 6.6 मिलियन हून अधिक लोकांनी बघितला आहे. इंस्टाग्राम यूजर प्रियंकाने हा व्हिडिओ शेअर करत आपल्यासोबत घडलेल्या घटनेची संपूर्ण स्टोरी सांगितली आहे.
प्रियंकाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, रॅपिडो ड्रायव्हरने ना स्वतः हेलमेट घातलेले होते, ना तिला दिले होते. तो वळणांवर आणि चुकीच्या बाजूने बाइक चालवत होता. याच वेळी एका वळणावर रॅपिडो बाइक समोर चालणाऱ्या दुसऱ्या बाइकला धडकली आणि दोघेही रस्त्यावर पडले. हे सर्व एका दिल्ली पोलिसांच्या वहनासमोर घडले. मात्र, पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. आणि आपण ड्रायव्हरला पैसे देऊन पुढचा प्रवास पायीच सुरू केला.
प्रियांकाने पुढे म्हटले आहे, "रॅपिडो, आपल्यावर स्वतःपेक्षाही अधिक विश्वास होता. आपणही तोडला... मला पहिल्यांदाच एखाद्या राईड दरम्यान एवढे असुरक्षित वाटले."
रॅपिडोचं उत्तर - या घटनेसंदर्भात रॅपिडोने प्रतिक्रिया देत कमेंटमध्ये म्हटले आहे, "आपण सुरक्षित असल्याची पुष्टी केल्याबद्दल धन्यवाद. आपल्या विनंतीनुसार, आम्ही रायडरवर कोणतीही कारवाई केलेली नाही. भविष्यात कुठलीही समस्या आल्यास आमच्याशी संपर्क साधावा."