Video : महिलेच्या जेवणात निघाली ४० मेलेली झुरळं, ऑनलाइन मागवली होती फेव्हरेट डिश!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 13:37 IST2019-03-14T13:32:13+5:302019-03-14T13:37:55+5:30
अलिकडे ऑनलाइन फूडचं चांगलंच चलन आहे. पण ऑनलाइन ऑर्डरच्या अनेक तक्रारी सुद्धा सुरू असतात.

Video : महिलेच्या जेवणात निघाली ४० मेलेली झुरळं, ऑनलाइन मागवली होती फेव्हरेट डिश!
अलिकडे ऑनलाइन फूडचं चांगलंच चलन आहे. पण ऑनलाइन ऑर्डरच्या अनेक तक्रारी सुद्धा सुरू असतात. म्हणजे बघा ना एका महिलेने मोठ्या आवडीने तिच्या पसंतीची डिश ऑर्डर केली. पण ती डिश पाहिल्यावर ही महिला केवळ बेशुद्ध पडायची बाकी राहिली.
चीनच्या एका महिलेने ऑनलाइन ऑर्डर करून आवडती डिश मागवली. ऑर्डर केलेली डिश आली आणि ती उघडून पाहिली तर त्यात एक-दोन नाही तर चक्क ४० मेलेल झुरळ आढळले. ही धक्कादायक घटना चीनच्या शेन्तोऊ शहरातील आहे.
नशीब या महिलेला ही झुरळं काही खाण्याआधीच आढळले. त्यानंतर या महिलेने एक एक करून ४० झुरळं बाहेर काढली. त्याचे फोटो काढून तिने सोशल मीडियावर शेअर केलेत.
मिररच्या रिपोर्टनुसार, महिला तिच्या मित्रांसोबत जेवण करण्याची तयारी करत होती. इतक्यातच तिने ऑर्डर केलेलं जेवण आलं. पॅकेट उघडल्यावर त्यातील झुरळं पाहून ती हैराण झाली. स्थानिक रिपोर्टनुसार, महिलेने सांगितले की, तिच्या एका मित्राला सर्वातआधी जेवणात एक झुरळ दिसला. त्यानंतर असे मेलेले आणखी काही झुरळं दिसले.
त्यानंतर या महिलेने केवळ रेस्टॉरंटची तक्रारच केली नाही तर डिशचे पैसेही परत घेतले आणि या प्रकरणाची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. दरम्यान, रेस्टॉरंटने झालेल्या प्रकाराबाबत माफी मागितली आहे. मात्र तरी सुद्धा १५ दिवसांसाठी त्यांना रेस्टॉरंट बंद ठेवण्याची शिक्षा देण्यात आली आहे.