शोरूममध्ये हस्तमैथुन करणाऱ्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल, सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 02:20 PM2020-05-11T14:20:17+5:302020-05-11T14:43:49+5:30

एका स्टोरमधील सोफ्यावर महिला हस्तमैथुन करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झालाय.

Woman filmed masturbating in China Ikea store; video goes viral api | शोरूममध्ये हस्तमैथुन करणाऱ्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल, सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया...

शोरूममध्ये हस्तमैथुन करणाऱ्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल, सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया...

googlenewsNext

शोरूममधे हस्तमैथुन करणाऱ्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल, सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया 
जगभरात वेगवेगळ्या वस्तू विकणारी कंपनी IKEA च्या चीनमधील मेगा स्टोरमध्ये एक महिलेच्या विचित्र वागणुकीची घटना चर्चेचा विषय ठरत आहे. या स्टोरमधील सोफ्यावर आणि बेडवर ही महिला हस्तमैथुन करत होती. इतकेच नाही तर या महिलेने असं करत असताना व्हिडीओ देखील रेकॉर्ड केलाय. 

या महिलेचा व्हिडीओ आता चीनमधील सोशल मीडियावर व्हायरल झालाय. सोशल मीडियातून लोक महिलेच्या अशा विचित्र वागण्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. IKEA कडून पोलिसात तक्रार केली गेली आणि नंतर महिलेला अटक करण्यात आली आहे.

(Image Credit : whatsonweibo.com)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसून येत आहे की, एका चीनमधील एक फर्निचर स्टोरमधे महिला सोफ्यावर बसून हस्तमैथुन करत आहे. कंपनीने स्टोरच्या लोकेशनबाबत काहीही माहिती जाहीर केली नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यावर हे स्टोर दक्षिण चीनच्या गुआंगझाऊमधील असल्याचे सांगितले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या व्हिडीओत हस्तमैथुन करणारी महिल कॅंटोनीज बोलत आहे.

चीनमधील वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सनुसार, IKEA चायनाने सांगितले की, या घटनेची चौकशी केली जात आहे. त्यांनी हे सांगितले नाही की, घटना कुठे घडली. कंपनीने आश्वासन दिलं आहे की, ते ग्राहकांना चांगला वातावरण देतील. सोबतच स्टोरची सुरक्षा आणि सॅनिटेशन आणखी वाढवली जाईल. 

अशाप्रकारची घटना IKEA स्टोरमधे पहिल्यांदाच घडली असं नाही. 2016 मध्येही अशीच एक घटना चीनच्या पेईचिंग शहरात घडली होती. 2015 मधे UNIQLO स्टोरमधीव एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यात एक कपल शारीरिक संबंध ठेवताना दिसलं होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला होता. 

Read in English

Web Title: Woman filmed masturbating in China Ikea store; video goes viral api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.