शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

Viral Video: चोरासोबत भिडली महिला, दुकानाला लुटण्यापासून वाचवलं, महिलेच्या धाडसाच होतंय सर्वत्र कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 14:09 IST

नुकतंच इंग्लंडमधील एका महिलेनं असं धाडस दाखवलं की सोशल मीडियावर तिचीच चर्चा रंगू लागली. या महिलेने एका चोराला दुकान लुटण्यापासून थांबवलं. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral on Social Media) झाला आहे.

तुम्ही एखाद्या प्रसंगाला कस तोंड देता यावरुन तुमची कुवत कळते. तुमचं धाडसं तुम्हाला माणूस म्हणून भरपूर मजबुत करत. त्यातही इतरांच्या मदतीसाठी स्वत:चा जीव धोक्यात घालणं या इतकं मोठं कार्य नव्हे. नुकतंच इंग्लंडमधील एका महिलेनं असं धाडस दाखवलं की सोशल मीडियावर तिचीच चर्चा रंगू लागली. या महिलेने एका चोराला दुकान लुटण्यापासून थांबवलं. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral on Social Media) झाला आहे.

लॅड बायबल वेबसाइटनुसार, न्यूहॅम, पूर्व लंडनमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली. जयमिन राणा नावाच्या व्यक्तीचं याठिकाणी दुकान आहे. त्यानं सांगितलं की रात्री २ वाजण्याच्या सुमारास त्याची आई दुकान सांभाळत असताना अचानक मास्क घातलेला एक माणूस दुकानात घुसला. महिलेनं त्या व्यक्तीबद्दल चुकीचा विचार केला नाही कारण तिला वाटलं की कोरोनामुळे त्याने मास्क घातलं आहे. मात्र अचानक त्याने एक बॅग काऊंटरवर ठेवली आणि यात सगळे पैसे टाकण्यास सांगितलं.

दुकानात असलेली एक महिला ग्राहक हे सर्व पाहात होती. तिने लगेचच या चोराला दुकान लुटू न देण्याचा निर्णय घेतला (Woman Attacks on Robber). तिने वारंवार चोराला निघून जाण्यास सांगितलं. यानंतर चोराने एक हत्यार काढल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसलं. त्याने दुकानदाराला धमकवायला सुरुवात केली, इतक्यात महिला ग्राहकाने चोरावर हल्ला केला (Woman Customer Fight with Robber to Protect Shop). तिने चोरावर हल्ला करण्यास सुरुवात करताच चोरानेही तिला जोरात धक्का देत जमिनीवर पाडलं. इतक्यात दुकानदाराने लगेचच पॅनिक अलार्मचं बटण दाबलं. यानंतर चोर तिथून निघून गेला.ॉ

महिला ग्राहकाच्या निर्भिडपणामुळे दुकानातील एकही सामान चोरी झालं नाही. मात्र, महिलेला किरकोळ दुखापत झाली. पोलिसांनी डेली मेलसोबत बोलताना सांगितलं की २० जानेवारीला त्यांना दुकानात चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळाली, यानंतर ते याठिकाणी पोहोचले. सोशल मीडियावर महिलेच्या धाडसाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लोकांचं असं म्हणणं आहे की आजच्या काळात अशा नागरिकांची गरज आहे, जे इतरांच्या मदतीसाठी धावून येतील. लोकांनी महिलेला हिरो म्हटलं आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाThiefचोरYouTubeयु ट्यूब