A woman drives her suv in gym api | Video : जिममध्ये वर्कआउट करण्यात मग्न होते लोक, महिला कार घेऊन घुसली आत!

Video : जिममध्ये वर्कआउट करण्यात मग्न होते लोक, महिला कार घेऊन घुसली आत!

जरा विचार करा की, तुम्ही जिममध्ये मग्न होऊ एक्सरसाइज करत आहात. अशाच अचानक एक एसयूव्ही कार जिमची भिंत तोडून आत घुसते, यावेळी काय वाटेल? असाच अनुभव इटलीतील South Philadelphia तील काही लोकांना आला. लोक एक्सरसाइज करण्यात व्यस्त होते अशाच एका जीपने भिंत तोडून आत एन्ट्री घेतली.

Planet Fitness नावाच्या जिममध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. रात्री साधारण ९ वाजताची ही घटना असेल. अचानक एक एसयूव्ही कार थेट जिममध्ये घुसली आणि सर्वांना एकच धक्का बसला. 

ज्यावेळी ही कार जिममध्ये घुसली तेव्हा जवळपास २० ते ३० महिला आणि पुरूष एक्सरसाइज करत होते. सुदैवाने कुणालाही काही इजा झाली नाही.

या जिममधीलच एक Kaytylin Meeler ने सांगितले की, सगळीकडे अचानक धूर झाला होता. त्यात जोरदार धमाका झाला. जाऊन बघितले तर एक कार जिममध्ये घुसली होती. जी महिला कार चालवत होती तिचं वय साधारण ४० च्या आसपास असेल. ही दुर्घटना झाली कशी याची माहिती मिळू शकली नाही.


Web Title: A woman drives her suv in gym api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.