भारतीय महिलेकडे नव्हते खाण्यासाठी पैसे, ५०० रुपये मागितल्यावर मिळाले ५० लाख! नेमकं प्रकरण काय वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 12:54 IST2022-12-21T12:53:07+5:302022-12-21T12:54:12+5:30
केरळमध्ये आर्थिक तंगीला सामोरं जात असलेल्या एका महिलेला अनोळखी व्यक्तींनी भरभरुन मदत केली आहे.

भारतीय महिलेकडे नव्हते खाण्यासाठी पैसे, ५०० रुपये मागितल्यावर मिळाले ५० लाख! नेमकं प्रकरण काय वाचा...
नवी दिल्ली-
केरळमध्ये आर्थिक तंगीला सामोरं जात असलेल्या एका महिलेला अनोळखी व्यक्तींनी भरभरुन मदत केली आहे. सोशल मीडियात क्राऊडफंडिंगच्या माध्यमातून महिलेला तब्बल ५० लाख रुपयांचं डोनेशन मिळालं आहे. संबंधित महिलेनं आपल्या मुलांसाठी शिक्षिकेकडे ५०० रुपये मागितले होते. मग त्याच शिक्षिकेनं महिलेल्या आर्थिक मदतीसाठी एक क्राउडफंडिंगची मोहीम सुरू केली होती.
४६ वर्षीय सुभद्रा यांच्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना आपलं कुटुंब सांभाळण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. सुभद्रा यांच्याकडे मुलांची जेवणाची व्यवस्था करण्याइतपतही पैसे नव्हते. यातच तिनं मुलांच्या वर्गशिक्षिकेकडे ५०० रुपयांची उधारी मागितली होती.
सुभ्रद्राची आर्थिक परिस्थिती पाहून वर्गशिक्षिका देखील भावूक झाल्या आणि त्यांनी सोशल मीडियात एक क्राउडफंडिंग अभियान सुरू केलं. जेणेकरुन तिला काही मदत करता येईल. सोमवारपर्यंत सुभ्रदाला क्राउडफंडिंगच्या माध्यमातून ५४ लाख ३० हजार रुपये प्राप्त झाले आहेत.
सुभद्रा या घर सांभाळात होत्या कारण त्यांच्या तीन मुलांपैकी सर्वात लहान मुलाला 'सेरेब्रल पाल्सी' आजार आहे. त्यामुळे संपूर्णवेळ त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. गेल्या आठवड्यात शुक्रवारी सुभद्रा यांनी स्थानिक शाळेतील शिक्षिका गिरिजा हरिकुमार यांच्याकडे मदतीची मागणी केली होती. कारण त्यांच्या मुलांना खाऊ देण्यासाठीही पैसे नव्हते. सुभद्राची निकड लक्षात घेऊन गिरिजा यांनी तिला १ हजार रुपयांची मदत देऊ केली. त्यानंतर गिरिजा यांनी सुभद्रा यांच्या घरी पोहोचल्या आणि त्यांनी पाहिलं की खरंच त्यांची परिस्थिती फारच हलाकीची आहे.
स्वयंपाक घरात नव्हता अन्नाचा एक कण
"सुभद्रा यांच्या स्वयंपाक घरात अन्नाचा एक कणही नव्हता. सर्व डबे रिकामे होते. मी विचार केला की फक्त १ हजार रुपयांच्या माझ्या मदतीनं तिची फार काही मदत होणार नाही. त्यामुळे क्राउडफंडिंगचं अभियान सुरू करण्याचं ठरवलं. जेणेकरुन मोठी रक्कम जमा करता येईल", असं गिरिजा यांनी सांगितलं.
गिरिजा हरिकुमार यांनी सुभद्राच्या कुटुंबाची हलाकीच्या परिस्थितीबाबत फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. यात त्यांनी मदतीचंहा आवाहन केलं होतं. तसंच तिच्या बँक खात्याचे डिटेल्स देण्यात आले होते. पाहता पाहता पोस्ट व्हायरल झाली आणि सुभद्राच्या बँक खात्यात ५० लाख रुपयांहून अधिकची रक्कम जमा झाली होती.