अँकर बोलूच देईना; महिला थेट लाईव्ह शोमध्ये नाचू लागली; व्हिडीओ तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 12:44 IST2022-01-19T12:42:56+5:302022-01-19T12:44:12+5:30

बोलण्याची संधी मिळत नसल्यानं महिलेनं लाईव्ह शोमध्ये सुरू केला डान्स

Woman Dances on News Channel Debate After Not Getting a Chance to Speak | अँकर बोलूच देईना; महिला थेट लाईव्ह शोमध्ये नाचू लागली; व्हिडीओ तुफान व्हायरल

अँकर बोलूच देईना; महिला थेट लाईव्ह शोमध्ये नाचू लागली; व्हिडीओ तुफान व्हायरल

वृत्तवाहिन्यांवरील चर्चा पाहून काहीवेळा अनेकांना वैताग येतो. चर्चेत सहभागी झालेल्या व्यक्ती बऱ्याचदा मुद्दे मांडता मांडता वाद घालू लागतात. त्यामुळे मुद्देसूद चर्चा घडत नाही. बऱ्याचदा एक-दोन मंडळीच जास्त वेळ बोलतात आणि इतरांना संधीच मिळत नाही. मात्र हा त्रास केवळ प्रेक्षकांनाच होतो अशातला भाग नाही. चर्चेत सहभागी झालेली मंडळीदेखील अनेकदा वैतागतात. वृत्तवाहिनीवरील अशाच एका चर्चेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर एक लहानसा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. वृत्तवाहिनीनं आयोजित केलेल्या चर्चेचा हा व्हिडीओ आहे. यामध्ये हिरवा रंगाचा कुर्ता घातलेली महिला नाचताना दिसत आहे. चर्चा सुरू असताना महिलेला वारंवार थांबवण्यात आलं. तिला बोलण्याची संधीच देण्यात आली नाही. त्यामुळे वैतागलेली महिला थेट डान्स स्टेप्स करू लागली. 

व्हायरल झालेला व्हिडीओ नेमका कोणत्या वाहिनीचा आहे ते समजू शकलेलं नाही. बहुधा हा कार्यक्रम बंगाली वृत्तवाहिनीचा आहे. महिलेच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ट्विटरवर अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. बऱ्याच जणांनी व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

Web Title: Woman Dances on News Channel Debate After Not Getting a Chance to Speak