Video : थेट सिंहासमोर उभी राहून त्याला चिडवू लागली ही बया आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 13:13 IST2019-10-03T13:13:39+5:302019-10-03T13:13:47+5:30

सिंह हा जंगलाचा राजा मानला जातो आणि त्याची कारणंही वेगवेगळी आहेत. सामान्यपणे सिंहाचं नाव ऐकताच लोकांची हवा टाईट होते.

Woman caught on camera taunting lion at bronx zoo video viral | Video : थेट सिंहासमोर उभी राहून त्याला चिडवू लागली ही बया आणि...

Video : थेट सिंहासमोर उभी राहून त्याला चिडवू लागली ही बया आणि...

सिंह हा जंगलाचा राजा मानला जातो आणि त्याची कारणंही वेगवेगळी आहेत. सामान्यपणे सिंहाचं नाव ऐकताच लोकांची हवा टाईट होते. अशात तो समोर आल्यावर काय होत असेल याची कल्पनाच न केलेली बरी. पण अमेरिकेतील एका महिलेने असा काही कारनामा केला की, लोक तिच्यावर सोशल मीडियातून टीका करत आहेत.

न्यूयॉर्कच्या ब्रॉन्स प्राणी संग्रहालयात एक महिला मस्ती करत सिंहाच्या समोर गेली. तिने समोर असलेल्या सिंहाला चिडवण्यासाठी नको-नको ते केलं. दरम्यान सिंह तिला केवळ बघत राहिला. त्याने काहीही न करता शांत राहण्यात भलं मानलं. काही वेळाने महिला बाहेर आली. 

महिलेचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ रिअल सोबरीनो नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर काही लोकांनी महिलेच्या या वागण्याला मूर्खपणा म्हटलं आहे. 

तेच ब्रॉन्स प्राणी संग्रहालयातील या घटनेबाबत व्यवस्थापनाने एक स्टेटमेंट जारी केलंय. ज्यात त्यांनी सांगितले की, महिलेने प्राणी संग्रहालयातील नियमांचं पालन केलं नाही. अशाप्रकारचं कृत्य करून तिचा जीवही जाऊ शकला असता. 

Web Title: Woman caught on camera taunting lion at bronx zoo video viral