शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नवरीने नवरदेवाच्या भांगेत भरलं कुंकु, नेटीझन्स मध्ये चर्चेला उधाण; टीका आणि शुभेच्छांचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 13:34 IST

एका अनोख्या लग्नाचा व्हिडिओ (Unique Marriage) चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये लग्नाच्या मंडपात बसलेली नवरीबाई नवरदेवाच्या भांगात कुंकू लावताना दिसते. हा व्हिडिओ (Viral Video of Bride and Groom) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

सहसा लग्नांमध्ये नवरदेव नवरीच्या भांगात कुंकू भरतो. मात्र सध्या सोशल मीडियावर कोलकातामधील एका अनोख्या लग्नाचा व्हिडिओ (Unique Marriage) चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये लग्नाच्या मंडपात बसलेली नवरीबाई नवरदेवाच्या भांगात कुंकू लावताना दिसते. हा व्हिडिओ (Viral Video of Bride and Groom) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे अनोखं लग्न २ डिसेंबरला झालं. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या नवरी आणि नवरदेवाचं नाव शालिनी आणि अंकन आहे. या लग्नात नवरदेवाने नवरीच्या भांगात कुंकू भरलंच मात्र सोबतच नवरीनेदेखील नवरदेवाच्या भांगात कुंकू भरल्याचं पाहायला मिळालं. हे फोटो शालिनीच बहीण कृतिका हिने सोशल मीडियावर शेअऱ केले आहेत.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये नवरीबाई आपल्या नवरदेवाच्या भांगात कुंकू भरताना दिसते. नवरदेवाच्या भांगात कुंकू भरताना शालिनीच्या चेहऱ्यावर हसू दिसतं. नवरदेवदेखील अगदी प्रेमाने नवरीकडून आपल्या भांगात कुंकू भरून घेतो. यानंतर नवरीबाई आपल्या नवरदेवाची गळाभेट घेते.

तिथे उपस्थित लोक या दोघांचाही उत्साह आणखीच वाढवत आहेत. हा व्हिडिओ पाहून लोकांना राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा यांच्या लग्नाची आठवण झाली आहे. या लग्नात पत्रलेखानेही राजकुमार रावच्या भांगात कुंकू भरलं होतं.

या बंगाली लग्नात सुरुवातीला संस्कृतमध्ये मंत्र बोलले गेले आणि यानंतर बंगालीमध्ये. फेसबुकवर हा अनोखा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यूजर्सनी या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांनी नवरदेवाला कुंकू लावण्याची पद्धत ही एक नवीन सुरुवात असल्याचं म्हटलं. तर अनेकांनी लग्नातील प्रथेचा अपमान केल्याचं म्हणत या जोडप्यावर टीकाही केली आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामmarriageलग्न