Video : बिकीनीतील तरूणीने पाण्यात उडी तर घेतली, पण त्यानंतर जे घडलं ते बघून बघतंच राहिले लोक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 11:24 IST2020-05-30T11:18:10+5:302020-05-30T11:24:33+5:30

एका तरूणीने उडी तर घेतली पण पाण्यात पडण्याआधी ती हवेत तरंगल्यासारखी वाटली. याचीच चर्चा होत आहे. 

Woman Appears To Float Mid-Air While Falling Off Rope Swing In Bizarre Video api | Video : बिकीनीतील तरूणीने पाण्यात उडी तर घेतली, पण त्यानंतर जे घडलं ते बघून बघतंच राहिले लोक...

Video : बिकीनीतील तरूणीने पाण्यात उडी तर घेतली, पण त्यानंतर जे घडलं ते बघून बघतंच राहिले लोक...

सध्या सोशल मीडियात एका व्हिडीओची चर्चा फारच रंगली आहे. या व्हिडीओत दोन बिकीनीतील तरूणी पाण्यात उडी घेताना दिसत आहे. पण यात एक ट्विस्ट आहे. एका तरूणीने उडी तर घेतली पण पाण्यात पडण्याआधी ती हवेत तरंगल्यासारखी वाटली. याचीच चर्चा होत आहे. 

Myka Shae नावाच्या इन्स्टाग्राम यूजरने हा व्हिडीओ सोमवारी शेअर केला होता. यात एक तरूणी दोराच्या मदतीने पाण्यात उडी घेते, पण पाण्यात पडण्याआधी ती कशातरी अडकते नंतर पाण्यात पडते. पण ती कशावर अडकते ते काही दिसत नाही. त्यानेच लोक हैराण झाले आहेत.

हा व्हिडीओ टेक्सासमधील असल्याचे सांगितले जात आहे. जेव्हापासून हा व्हिडीओ शेअर केलाय तेव्हापासून या व्हिडीओ आतापर्यंत 2.5 लाख व्ह्यूज मिळाले आहेत  आणि यावर 700 पेक्षा जास्त कमेंट आल्या आहेत. लोक वेगवेगळे अंदाज बांधत आहेत की, ही महिला हवेत तरंगली कशी.

लोकांमध्ये चर्चा रंगली आहेच. त्यामुळे हा व्हिडीओ जास्तीत जास्त वेळा बघितला जात आहे. लोक विचार करत आहेत की, महिलेसोबत असं झालं कसं? बघा तुम्हाला काही सापडतं का.

Web Title: Woman Appears To Float Mid-Air While Falling Off Rope Swing In Bizarre Video api